Majha Vitthal Majhi Wari : वारकऱ्यांना आनंद देणारा रिंगण सोहळा : माझा विठ्ठल माझी वारी : 20 जून 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
रामकृष्णहरी माउली.. म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत…

बाराही सोळा गडियांचा मेळा

सतरावा बसवंत खेळिया रे।

नाचत पंढरी जाऊ रे खेळिया।

माउली आज बेलवडीमदी तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं बगा.. आवं काय त्यो वारकऱ्यांचा उत्साह.. सकाळी सकाळी वारकऱ्यांचा महामेळा या रिंगनसोहळ्यात सहभागी झाला बगा.. वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्यांना आनंद देणारा आसतुया. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून सकाळच्याला साडेसात वाजता बेलवडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला.या रिंगण सोहळ्यायेळी सगळ्यांचं लक्ष व्हतं त्ये म्हंजी मानाच्या अश्वाकडं… अश्वानं धाव घेतली अन् वायु येगानं दौडनाऱ्या त्या अश्वाला बगून समदा आसमंत दुमदुमुन गेला वो.. मंग जसं पताकाधारी वारकऱ्यांनी रिंगनाला फेरी मारली तवा आकाशाची स्पर्धा करनाऱ्या या भगव्या पताकांनी समदं वातावरन भारावुन गेलं बगा…यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या माउल्या रिंगनात आल्या तसा रिंगनाला हुरुप आला बगा..

[ad_2]

Related posts