Why Hardik Pandya Is Not Playing Test Cricket ; टी-२० चा कर्णधार असूनही हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेट का खेळत नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : कसोटीतील पराभवामुळे आता रोहित शर्मा चांगलाच ट्रोल होत आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवा, अशी मागणीही चाहते करत आहेत. यावेळी रोहितला चांगला पर्याय म्हणून हार्दिक पंड्याचे नाव पुढे येत आहे. पण हार्दिक टी-२० संघाला कर्णधार असला तरी तो कसोटी क्रिकेटच खेळत नसल्याचे समोर येत आहे. पण हार्दिक कसोटी क्रिकेट का खेळत नाही, याचे एकमेव कारणही आता समोर आले आहे.हार्दिक हा धडाकेबाज फलंदाज तर आहेच, पण तो वेगवान गोलंदाजीही करतो. आयपीएलमध्ये या दोन्ही गोष्टी आपण हार्दिककडून पाहिल्या आहेत. या गोष्टींचा फायदा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला झाला होता. सध्याच्या घडीला भारतीय संघाला हार्दिकसारख्या कर्णधाराची गरज आहे. पण हार्दिक कसोटी क्रिकेट का खेळत नाही, याचे कारण समोर आले आहे.

हार्दिक पंड्या सुरुवातीला कसोटी क्रिकेट खेळत होता. पण २०१८ साली हार्दिकला पाठीची दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला बराच काल क्रिकेटपासून लांब रहावे लागले. त्यानंतर हार्दिकने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले खरे, पण तरीही तो गोलंदाजी करत नव्हता. त्यावेळी हार्दिक हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात होता, संघाला गोलंदाजाची गरज होती. पण तरीही हार्दिक मात्र गोलंदाजी करत नव्हता. त्यानंतर फक्त फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असे हार्दिकला म्हटले जात होते. पण २०२१ साली अखेर विश्वचषकात त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्याच्या घडीला हार्दिक हा फिटनेस सांभाळून खेळत आहे. त्यामुळे त्यांने फक्त टी-२० आणि वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. या पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक कसोटी क्रिकेट खेळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

हार्दिकला आपल्या क्रिकेटची कारकिर्द वाढवायची आहे. त्यामुळे तो फक्त मर्यादीत षटकांच्या सामन्यांत खेळत आहे. जर त्याने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर त्याला जास्त काळ क्रिकेट खेळता येणार नाही, असे वाटत आहे. त्यामुळेच हार्दिक कसोटी क्रिकेटपासून लांब असल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Related posts