Fastest Century Scored By Arshin Kulkarni in MPL 2023 ; सर्वात जलद शतक ठोकणारा अर्शिन कुलकर्णी आहे तरी कोण जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अर्शिन कुलकर्णी या खेळाडूची सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण अर्शिनने सर्वात जलद शतक झळकावले आहे. यामध्ये त्याने फक्त १६ चेंडूंत ९० धावांची तुफानी खेळी साकारली आहे. त्यानंतर हा अर्शिन कुलकर्णी आहे तरी कोण, याची चर्चा सुरु झाली आहे.महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये हा विक्रम झाल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा आणि नाशिक टायटन्स यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात टायटन्सची प्रथम फलंदाजी होती. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अर्शिनने. कारण त्याने धडाकेबाज फलंदाजी करत पुण्याच्या संघाची हवाच काढून टाकली होती. यावेळी मैदानातील प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन अर्शिनने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर घडवले. दणकेबाज फटकेबाजी करत अर्शिनने शतक झळकावले आणि महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील हे सर्वात जलद शतक ठरले. यावेळी अर्शनने १३ षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे अर्शिनने चौकार आणि षटकारांच्या मदतीने ९० धावा जमवल्या, त्यामुळे त्याला ४६ चेंडूंत आपले शतक झळकावता आले. फक्त एवढ्यावरच अर्शिन थांबला नाही तर अचूक गोलंदाजी करत त्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर हा अर्शिन नेमका आहे तरी कोण, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.अर्शिन कुलकर्णी आहे तरी कोण, जाणून घ्या…
अर्शिन हा महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील एक १८ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू आहे. अर्शिनने या सामन्यात फक्त धडाकेबाज शतक झळकावले नाही तर त्याने चार विकेट्सही मिळवल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या संघाला यावेळी विजयासाठी अखेरच्या षटकात फक्त पाच धावांची गरज होती. पण अर्शिनने यावेळी अचूक आणि भेदक गोलंदाजी करत पाच धावांचा बचाव केला आणि टायटन्सच्या विजयाचा मोलाचचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या एका सामन्यानंतर अर्शिन हा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

अर्शिनने एकाच सामन्यात शतक आणि चार विकेट्स मिळवण्याची दमदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून चाहत्यांचा अपेक्षा वाढलेल्या असतील.

[ad_2]

Related posts