Maharashtra Rain Weather Forecast Update Monsoon Likely To Hit Mumbai Neighboring Districts Within 2-3 Days Says IMD

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Rain Update : उशिरा का होईना, पण महाराष्ट्रात येत्या 23 तारखेनंतर अर्थात येत्या शुक्रवारनंतर पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खरंतर, एरवी 7 जूनला येणाऱ्या पावसाने, यंदा मात्र जूनचा शेवटचा आठवडा आला तरी ओढ दिलीय. त्यामुळे, महाराष्ट्रातील धरणांनी एव्हाना तळ गाठलाय. आणखी काही दिवस पाऊस रुसलेलाच राहिला तर, महाराष्ट्रापुढे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. सोबतच, अंगाची लाहीलाही करणारा उकाडा, उष्ण वारे आणि उन्हाची काहिली यामुळे, नागरिक हैराण झालाय. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आणि ज्यांनी पेरण्या केल्यायत त्यांच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. त्यातच आता हवामान विभागाने 23 जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. ही दिलासादायक गोष्टय. दरम्यान, यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि 21 जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात 23 तारखेनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, असे सांगण्यात आलेय. मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून हलक्या स्वरूप पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर 24-25 जून रोजी पावसाची शक्यता आहे. 

पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे.  बिपरजॉय सध्या उत्तर भारतात बघायला मिळतोय. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरमधील करंट महत्त्वाचे असतात.  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पुणे इथे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.  जून महिन्यात पावसाला उशीर झाला असला तरी पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहील.  एल निनोचा खूप परिणाम जाणवणार नाही. माईल्ड परिणाम असेल. अनेकदा एल निनो असून देखील चांगला पाऊस पडतो त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे हवामान विभागाने सांगितलेय.  

या वेळेस 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात तयार होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या अठवण्यात भरपूर पाऊस पडेल व जूनमध्ये जे नुकसान झालं आहे ते भरून निघेल. ऑक्टोबरमध्ये मान्सून परतीचा रस्ता धरू शकेल मात्र तोपर्यंत पाऊस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 



[ad_2]

Related posts