[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बर्मिंगहम : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिय यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार सुरु होता. हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. त्यावेळीच इंग्लंडच्या संघाकडून एक मोठी चूक घडली. अटीतटीच्या वेळी इंग्लंडकडून एक कॅच सुटली आणि तिथेच इंग्लंडच्या संघाने सामना गमावल्याचे पाहायला मिळाले.ही गोष्ट घडली ती ८४ व्या षटकात. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा गोलंदाजी करत होता. ब्रॉडला यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजीला आणले होते. कारण इंग्लंडला यावेळी विकेट्सची गरज होती आणि त्यांनी नवीन चेंडूही घेतला होता. त्यामुळे इंग्लंडला ब्रॉडकडून यावेळी मोठ्या आशा होत्या. त्यामुळे स्टोक्सने त्याच्या हाती चेंडू सुपूर्द केला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा नॅथम लायन फलंदाजी करत होता. लायन त्यापूर्वी फक्त पाच चेंडू खेळला होता आणि दोनच धावा त्याच्या नावावर होत्या. या दुसऱ्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी लायनचे टायमिंग चुकले आणि त्याचा फटका हुकला. यावेळी हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जात होता आणि तिथे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स उभा होता. स्टोक्स आता ही कॅच पकडणार, असे सर्वांनाच वाटत होते. कारण यावेळी स्टोक्स हा चेंडूच्या मागे असल्याचे पाहायला मिळत होते आणि चेंडू त्याच्या दिशेने जात होता. त्यामुळे स्टोक्स ही कॅच पकडेल असे वाटत होते. पण त्याचवेळी स्टोक्सचा अंदाज चुकला. हा चेंडू स्टोक्सच्या हाताला लागला खरा, पण तो त्याच्या हातातून उडाला. स्टोक्सने जीवापाड झेल टिपण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला हा झेल काही टिपता आला नाही.
जर स्टोक्सने हा झेल टिपला असता तर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का बसला असता आणि इंग्लंडच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होऊ शकला असता.
जर स्टोक्सने हा झेल टिपला असता तर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का बसला असता आणि इंग्लंडच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होऊ शकला असता.
स्टोक्सच्या हातून हा झेल सुटला तेव्हा लायन २ धावांवर होता. या जीवदानाचा त्याने चांगलाच फायदा उचलला आणि नाबाद १६ धावांची खेळी केली. त्याचबरोबर लायनने यावेळी कर्णधार पॅट कमिन्सला चांगली साथ दिली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला.
[ad_2]