[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते… ती स्टोरी ज्यावेळी सक्सेस स्टोरी होते त्यावेळी लोक तुम्हाला ऐकण्यासाठी येतात… हे शब्द आहेत दर्शना पवारच्या शेवटच्या भाषणातले. पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये दर्शनाने सत्काराच्या वेळी हे भाषण केलं होतं. हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शनाचा ट्रेकिंगला गेल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
दर्शना दत्तू पवार, वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी दर्शना पवार एमपीएससी पास झाली. वनसेवेच्या परीक्षेत ती राज्यात तिसरी आली. अत्यंत खडतर संर्घषातून तिने हे यश मिळवलं होतं. पण तिला आणि तिच्या कुटुंबियांना या यशाचा आनंद जास्त काळ घेता आला नाही. पुण्यातून सत्कार स्वीकारून दर्शना राजगडला ट्रेकिंगला गेली आणि तिचेच तिच्या संघर्षमय जीवनाचा अंत झाला. तिच्यासोबत तिचा एक मित्र होता, तो मित्र गायब असल्याने त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये सत्कार स्वीकारायला गेल्यानंतर दर्शनाने त्या ठिकाणी भाषण केलं होतं. त्यामध्ये दर्शनाने यश काय असतं हे अगदी मोजक्याच शब्दात सांगितलं होतं.
Darshana Pawar Last Speech : काय म्हणाले दर्शना?
प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते, ही स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच इच्छुक असतात ज्यावेळी ती स्टोरी सक्सेस स्टोरी बनून येते. आपण शाळेमध्ये, महाविद्यालयात खूप चांगले गुण मिळवतो, पण आता जे सक्सेस मिळवलंय ते अधिक चांगलं वाटतंय. अनेकजण आपल्याला भेटायला त्यांच्या मुलींना घेऊन येतात, अभ्यास कसं करायचं विचारतात.
जेव्हा आपण अपयशी ठरतो त्यावेळी त्यामागे फक्त आपलाच हात असतो, आपण कुठेतरी कमी पडलो असतो. पण ज्यावेळी यशस्वी होतो ना त्यावेळी खूप लोकांची मेहनत त्यामागे असते.
मला माझ्या आईवडिलांनी कधीच सांगितलं नाही की तू ही गोष्ट करु शकत नाहीस. माझ्या बाबतीत ते नेहमी ओव्हर कॉन्फिडंट असतात. पण मी त्यांना सांगायची की जरासं कंट्रोल करा, ही एमपीएससी आहे. पण तू नक्की पास होणार हे मला त्यांनी सांगितलं. मला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं, माझ्या यशमागे माझ्या पालकांचा आणि मित्रमैत्रिणींचा हात आहे.
ही बातमी वाचा :
[ad_2]