Medics Fear COVID Vaccine Link To Australian Cricketer Shane Warne Death Know Reason Behind The Sudden Death

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shane Warne Death Reason : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न (Shane Warne) याच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आता पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूवरुन चर्चा रंगल्या आहेत. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननं कोरोनाची जी लस घेतली होती, त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार जडण्याचा धोका असल्याचं डॉक्टरांनी अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाला होता. 

विशेष म्हणजे, शेन वॉर्नला थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी त्यानं कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. शेन वॉर्नला मिळालेली कोरोना लस हृदयाशी संबंधित आजार वाढवते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टनी या अहवालात शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असं म्हटलं आहे.

शेन वॉर्नला COVID mRNA लस मिळाली होती. या लसीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी ही लस देण्यात आली होती. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा ​​आणि डॉ. ख्रिस नील यांनी सांगितलं की, कोविड mRNA लसीमुळे कोरोनरी रोगाचा झपाट्यानं प्रसार होऊ शकतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांना लस घेतल्यानंतर धोका अधिक वाढतो. 

डॉक्टर मल्होत्रा यांनी बोलताना सांगितलं की, “ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नला वयाच्या 52 व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्वांनाच माहीत आहे की, शेन वॉर्नची लाईफस्टाईल तशी फारशी हेल्दी नव्हती. वॉर्न स्मोकिंग करत असे आणि त्याचं वजनही जास्त होतं. माझ्या वडिलांचा मृत्यूही फायझर वॅक्सिनचे दोन डोस घेतल्यानंतर झाला होता. एवढंच नाहीतर त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर वेगानं वाढ झाली होती.”

शेन वॉर्नची कारकीर्द

जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत.  सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा शेन भारतीय क्रिकेटमध्येही चांगलाच सक्रीय होता. सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या  राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे. 

[ad_2]

Related posts