Maharashtra News Chandrashekhar Bawankule  criticism On Mahavikas Aghadi In Yavatmal 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Bawankule : विरोधी पक्षात सुरु असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी खुर्ची एक आणि चेहरे दहा आहेत असा टोला बावनकुळेंनी लगावला. विरोधकांची वज्रमुठ आता संपली असल्याचे ते म्हणाले. मोदी@9 अंतर्गत यवतमाळ (Yavatmal)  येथे संपर्क ते समर्थन असा भाजपचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बाबुळगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिल्लक सेना, किंचित सेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दहा मुख्यमंत्री पदाचे चेहरे असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटावरही टीका केली.

अडीच वर्षात फक्त दोन वेळा उद्धव ठाकरे मंत्रालयात 

अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे हे फक्त दोन वेळा मंत्रालयात आले. त्यावेळी त्यांनी आमदारांचे काम केले नाही. त्यामुळेच 50 आमदारांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जूनला गद्दार दिवस साजरा केला. पण 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी काँग्रेसशी गद्दारी करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवल्याचे बावनकुळे म्हणाले.

पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता 2024 मध्येही जनता मोदीजींची साथ देणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य उपमुख्यमंत्री, 2024 साठी पवार-ठाकरेंचा मोठा प्लॅन होता – बावनकुळे

[ad_2]

Related posts