१ जून ते ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या समुद्रात मासेमारीला सरकारची बंदी

मुंबई- पावसाळ्यात मासे प्रजननासाठी किनाऱ्यावर येतात. या काळात खराब आणि वादळी हवामान असते. त्यामुळे वित्त आणि जीवितहानीची शक्यता असल्याने ती टाळण्यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र सरकारने १ जून ते ३१ जुलै २०२२ या काळात समुद्रात मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाने दिला आहे.
मासळीच्या प्रजोत्पादनासाठी पावसाळ्यात पोषक वातावरण असते. या काळात अंडी घालण्यासाठी मासे किनाऱ्यावर येतात. त्यामुळे कमीत कमी मासेमारी व्हावी या हेतूने सरकार दरवर्षी पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घालते. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत बंदी असते. यांत्रिकी बोटीना ही बंदी लागू आहे. पारंपारिक पद्धतीची बिगर यांत्रिकी नौका यातून वगळण्यात आली आहे. १ जून ते ३१ जुलै २०२२ या काळात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मासेमारीला सरकारने बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.

Related posts