[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हुसेन दाऊद यांचे पुत्र असलेल्या शहजादा २००३ मध्ये एँग्रो कॉर्पोरेशनमध्ये सहभागी झाले. ऑक्टोबर २०२१ मध्ये ते कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष झाले. सध्या ते दाऊद हर्क्युलिस कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कृषी, ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. शहजादा दाऊद यांची एकूण संपत्ती १३.६ कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे.
शहजादा दाऊद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुलेमानदेखील पाणबुडीत होता. ग्लासगोमधील स्ट्रॅथक्लाईड विद्यापीठात तो व्यवसायाचं शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो प्रथम वर्षात उत्तीर्ण झाला. वडिलांप्रमाणेच त्यालादेखील विज्ञान आणि फिक्शन पुस्तकांमध्ये रस होता. शहजादा आणि सुलेमान यांच्यातलं नातं अनोखं होतं. ते एकमेकांना खूप सांभाळून घ्यायचे. साहस दोघांच्याही रक्तात होतं. त्यामुळे त्यांच्यातले ऋणानुबंध घट्ट होते.
शहजादा आणि सुलेमान समुद्राच्या पोटात शिरण्यापूर्वी त्यांनी अजमेह दाऊदशी संपर्क साधला. त्यावेळी बापबेटे पोलर प्रिन्स या कमांड शिपवर होते. ही शिप टायटन पाणबुडीला समुद्रात घेऊन गेली. अजमेह शहजादा यांची बहीण होती. सुलेमानची आत्या होती. ‘पाण्यात शिरण्याच्या काही मिनिटांपूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यावेळी भाचा सुलेमानशी बोलले. सुलेमान खूप घाबरला होता. त्यानं मला तसं सांगितलं. पण केवळ वडिलांसाठी तो टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेला. वडिलांसोबत असलेलं नातं आणखी घट्ट करण्यासाठी तो खोल समुद्रात जाण्यास तयार झाला होता,’ असं अजमेह यांनी सांगितलं.
[ad_2]