Hepatitis A Symptoms And Treatment; अस्वच्छतेमुळे होणाऱ्या हेपेटाइटिस ए ची लक्षणे आणि उपचार, दुर्लक्ष केल्यास ठरू शकतो गंभीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हेपेटाइटिस ए चा धोका कोणाला आहे?

हेपेटाइटिस ए चा धोका कोणाला आहे?

लसीकरण न केलेले किंवा यापूर्वी संसर्ग झालेल्या कोणालाही Hepatitis A विषाणूची लागण होऊ शकते. ज्या भागात विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे त्या स्थानिक भागात, हेपेटाइटिस ए संक्रमण लहान मुलांमध्येही दिसून येते.

अस्वच्छता,गढूळ पाणी, संक्रमित व्यक्ती असलेल्या घरात राहणे, लसीकरण न करता उच्च प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास करणे हे हेपेटाइटिस ए ची लागण होण्यास कारणीभूत ठरते.

हेपेटाइटिस ए ची लक्षणे काय आहेत?

हेपेटाइटिस ए ची लक्षणे काय आहेत?
  • उलट्या होणे
  • ताप येणे
  • पोटदुखी
  • गडद लघवी
  • भूक न लागणे
  • अंगाला खाज येणे
  • अतिसार, थकवा
  • नंतरच्या टप्प्यात कावीळ होणे

संक्रमित व्यक्तीची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनाही कावीळ झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हेपेटाइटिस ए प्रभावित बहुतेक रुग्ण स्वतःच बरे होतात. परंतु, ०.५% रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते.

(वाचा – दाताच्या पिवळेपणापासून ते तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत गुणकारी ठरेल तुरटी, असा करा सोप्या पद्धतीने वापर)

हेपेटाइटिस ए चे निदान कसे करावे?

हेपेटाइटिस ए चे निदान कसे करावे?

उपचार करणारे डॉक्टर तुमचा वैद्यकीय इतिहास तपासतात तसेच रक्तातील अँटीबॉडीजची चाचणी केली जाते, ज्याला अँटी-एचएव्ही IgM असे म्हणतात. हे ऍन्टीबॉडीज एखाद्याला Hepatitis A आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करतात.

(वाचा – जेवल्यानंतर का खावी बडिशेप खडीसाखर, ५ आरोग्यदायी फायदे)

उपचार आणि प्रतिबंध कसा करता येईल?

उपचार आणि प्रतिबंध कसा करता येईल?

हेपेटाइटिस ए साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. संसर्गानंतर लक्षणे कमी होण्यास काही काळ जातो यास काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. स्वत: च्या मर्जीने कोणतेही औषधोपचार करू नका. डॉक्टर तुम्हाला पौष्टिक आहार घेण्यास आणि भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतील. जर तुम्हाला हेपेटाइटिस ए विषाणूची लागण झाली असेल तर धुम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा.

(वाचा – सकाळीच उपाशीपोटी प्या या काळ्या दाण्याचे पाणी, पोट होईल साफ आणि मिळतील ७ जबरदस्त फायदे)

हेपेटाइटिस ए चा प्रसार कसा कमी कराल?

हेपेटाइटिस ए चा प्रसार कसा कमी कराल?

पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करुन ठेवणे, गाळून व उकळून पाणी प्यावे, सांडपाण्याची वेळीच विल्हेवाट लावणे. वैयक्तिक स्वच्छतेचा सवयींचे पालन करणे जसे की जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणे. Hepatitis A ची लस १ वर्षावरील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. लसीकरणामुळे या रोगापासून दूर राहता येते.

[ad_2]

Related posts