गुजरातच्या अनेक भागांत पूरस्थिती, गावांचाही संपर्क तुटला; ११ जणांचा मृत्यू, अमित शहा अलर्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद: मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांतील काही भागात अत्यंत मुसळधार पाऊस झाल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्यवाही केंद्राच्या आकडेवारीवरून दिसून आले.

रस्ते जलमय झाल्यामुळे किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ आणि एसडीआरएफ) अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या कार्यात गुंतलेले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कच्छ, जामनगर, जुनागढ आणि नवसारी येथे आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे.

पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं; संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर मनपा सज्ज

जामनगरला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून शुक्रवारपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. घरात साचलेले पाणी उपसत असताना शुक्रवारी एका तीन वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर मुसळधार पावसात बेपत्ता झालेल्या दोन पुरुषांचे मृतदेह शनिवारी बचाव पथकाला सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लिंबडी तालुक्यातील गावांचा संपर्क पुरामुळे तुटला. येथील एका गावात अडकलेल्या सात जणांना स्थानिक रहिवाशांनी वाचवले.

गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ३२ मिलिमीटर पाऊस झाला असून, वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक २३४ मिमी पाऊस पडला. राज्यातील २०५ तालुक्यांमध्ये लक्षणीय पाऊस झाला आहे. वलसाड, नवसारी, जुनागढ, अमरेली, छोटा उदेपूर, अहमदाबाद आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये २४ तासांत १०० ते २३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Manipur Violence: मणिपूर धुमसतेच! विष्णूपूर जिल्ह्यात ३ ग्राम स्वयंसेवकांची हत्या, ५ जण जखमी
दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत गुजरातच्या अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी राज्यातील पूरस्थितीवर चर्चा केली. या कठीण काळात केंद्र आणि राज्य सरकार लोकांच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशातील प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ५० हजार रुपये मिळण्याची हमी; पंतप्रधान मोदींचा दावा

[ad_2]

Related posts