India vs West Indies 1st Test Match Will Be Postpone ; भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना पुढे का ढकलणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताने आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. पण त्यानंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना आता पुढे ढकलण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भारताचा वेस्ट इंडिजचा दौरा आता उशिराने सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन क्रिकेट कसोटींची मालिका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या मालिकेतील पहिली कसोटी १२ जुलैपासून सुरू होईल, असे ठरले आहे. मात्र, वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा ९ जुलैपर्यंत होणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात बदल होईल, असा कयास आहे.

वन- डे क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेची अखेरची लढत ९ जुलै रोजी हरारेमध्ये आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेतील पहिली कसोटी रोहझोह येथे होणार आहे. रोहझोह ही डॉमिनिकाची राजधानी आहे. हरारे आणि रोहझोह या प्रवासाला किमान दोन दिवस लागतात. ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ प्रामुख्याने कसोटी; तसेच मर्यादित षटकांच्या लढतीसाठी भिन्न संघांची निवड करीत असते. मात्र, या वेळी कसोटी संघातील जेसन होल्डर, काइल मेयर्स, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ यांची वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील अव्वल दोन संघ मुख्य स्पर्धेस पात्र ठरतील. त्यामुळे अंतिम सामना केवळ औपचारिक आहे. कसोटी संघातही असणाऱ्या विंडीज खेळाडूंनी अंतिम लढतीपूर्वी कसोटी संघात दाखल व्हावे, यासाठी ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ प्रयत्नशील आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मालिकेतील दुसरी कसोटी २० ते २४ जुलैदरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हलवर खेळली जाणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैला सुरु होणार होता. पण आता हा सामना उशिरा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबत भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळं आपला निर्णय अधिकृतपणे जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

[ad_2]

Related posts