Agriculture News E Auction Of Wheat And Rice To Control Rising Prices Says FCI President

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News : गहू (wheat) आणि तांदळाच्या (Rice) किरकोळ बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं भारतीय अन्न महामंडळाला (FCI) ई-लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत. लिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर (गहू साठा निरीक्षण यंत्रणा) नोंदणी अनिवार्य आहे. भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक के. के. मीना यांनी याबाबतची माहिती दिली.

गहू आणि तांदळाचे किरकोळ बाजारातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारातील हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. लिलाव प्रक्रियेतील सहभागी होणाऱ्या अधिकृत विक्रेते आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एफएसएसएआय (FSSAI) परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. 

गहू खरेदीची कमाल मर्यादा 100  मेट्रिक टन

दरम्यान, गव्हाची आधारभूत किंमत सध्याच्याच पातळीवर स्थिर ठेवण्यात आली आहे. फेअर ऍव्हरेज क्वालिटी (FAQ) साठी प्रतिक्विंटल 2150 रुपये आणि अंडर रिड्यूज स्पेसिफिकेशन (URS) गव्हासाठी प्रतिक्विंटल 2125 रुपये आहे. गव्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने या लिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर नोंदणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या ई-लिलावामध्ये खरेदीदार ज्या कमाल रकमेसाठी बोली लावू शकतो ती कमाल मर्यादा 100 MT (मेट्रिक टन) पर्यंत मर्यादित आहे. लहान गहू विक्रेते आणि व्यापाऱ्यांना सामावून घेण्यासाठी, किमान प्रमाण 10 मेट्रिक टन ठेवण्यात आले आहे. गव्हाचे छोटे व्यापारी आणि प्रक्रिया करणार्‍यांना सामावून घेण्यासाठी, ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) मर्यादा देखील पूर्वीच्या स्तरांपेक्षा 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

5 जुलैपासून तांदळाचा ई-लिलाव सुरु होणार

स्थानिक खरेदीदारांसाठी ही लिलाव प्रक्रिया मर्यादित ठेवण्यात आली आहे. राज्याची जीएसटी नोंदणी तपासून आणि साठा सोडण्यापूर्वी तो तपासला गेला आहे याची खात्री केली जाणार आहे. विशिष्ट राज्यात मागणी केलेल्या साठ्याची स्थानिक पातळीवर व्यापक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय केले जातात. पहिल्या ई-लिलावात देशभरातील 457 केंद्रांमधून 4 एलएमटी गहू खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर 271 खरेदीदारांचे नवीन पॅनल तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत पॅनलवर 2093 सक्रिय बोलीदार आहेत. खुली बाजार विक्री योजनेअंतर्गत अंतर्गत तांदळाचा ई-लिलाव 5 जुलै, 2023 पासून सुरू होईल. तांदळाची मूळ किंमत 3100 क्विंटल आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून (FCI)  15 मार्च 2023 पर्यंत गव्हाचे सहा साप्ताहिक ई-लिलाव केले गेले. एकूण 33.7 एलएमटी गहू उपलब्ध करून देण्यात आला. 45 दिवसांच्या कालावधीत या मोठ्या हस्तक्षेपामुळं गव्हाच्या किंमती 19 टक्क्यांनी कमी झाल्या. गव्हाच्या रब्बी खरेदीच्या कालावधीमुळं बाजारातील हस्तक्षेप देखील थांबला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

Wheat Procurement : गहू खरेदीत 42 टक्क्यांची वाढ, पंजाब हरियाणा आघाडीवर; काही भागात अवकाळीचा फटका 

[ad_2]

Related posts