IPL 2023 Ambati Rayudu CSK Player Became Father Second Time Wife Gave Birth To Baby Girl : IPL खेळणाऱ्या स्टार खेळाडूला मिळाली गुड न्यूज; मोठ्या मुलीसह शेअर केला बाळाचा गोड फोटो

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई: आयपीएल २०२३च्या साखळी फेरीतील लढती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. प्रत्येक संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. अशात एका स्टार खेळाडूला आनंदाची बातमी मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा भारताचा खेळाडू अंबाती रायडूला मुलगी झाली आहे.काल म्हणजेच १६ मे रोजी अंबाती रायडू दुसऱ्यादा बाप झाला. रायडूची पत्नी चेन्नुपल्ली विद्याने एका गोड मुलीला जन्म दिला. ३७ वर्षीय रायडूने ही बातमी इंस्टाग्रामवरून सर्वांना दिली.

अंबाती रायडूने त्याची मोठी मुलगी आणि नुकतेच जन्मलेल्या बाळाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना तो म्हणतो, मुली या देवाने दिलेले वरदान असतात. रायडूला २०२० मध्ये पहिली मुलगी झाली होती.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ देखील रायडूच्या या आनंदात सहभागी झाला. सीएसकेने ट्वीट करून त्याचे अभिनंदन केले. सुपर डॅडीला दुप्पट आनंद झाला असेल. अंबाती रायडू आणि त्याच्या कुटुंबाला खुप शुभेच्छा.

रायडू आणि चेन्नुपल्ली विद्या यांचा विवाह २००९ साली झाला होता. रायडू कॉलेजमध्ये असतानाच विद्याच्या प्रेमात होता. २००९ मध्ये त्यांनी व्हॅलेटाइन डेला विवाह केला होता. त्यानंतर २०२० साली जुलै महिन्यात त्यांना पहिली मुलगी झाली होती.

आयपीएलच्या या हंगामात रायडूला अद्याप फार चांगली कामगिरी करता आली नाही. १२ सामन्यात त्याने १२७.०८च्या स्ट्राइक रेटने फक्त १२२ धावा केल्या आहेत. संघाच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर चेन्नईचा संघ १३ पैकी ७ विजय, ५ पराभव आणि १ ड्रासह १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना एक विजय पुरेसा आहे. चेन्नईची अखेरची लढत दिल्लीविरुद्ध होणार आहे.

[ad_2]

Related posts