[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आधी जुना मोबाईल घ्या, त्याला दुरुस्त करा आणि मग विका…
सगळ्यात विशेष म्हणजे पहिल्या वर्षीच साकेत आणि त्याच्या मित्राला जुने फोन विकण्याच्या या व्यवसायात मोठं यश मिळालं. सुरुवातीला कंपनीचा महसूल ८ कोटी, नंतर १९ कोटी मग २४ कोटी आणि आता थेट ४४ कोटींवर पोहोचला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये त्यांच्या कंपनीने थेट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. इतकंच नाहीतर गेल्या वर्षभरात कंपनीने तब्बल २०० कोटींचा महसूल मिळवला आहे.
YourStory नुसार, साकेतच्या Refit Global या कंपनीने Flipkart, Amazon, Oppo, Xiaomi आणि Vivo वर एक्सचेंज ऑफर देत फोन खरेदी केले. या मोबाईलमध्ये असलेले बिघाड ठीक करत त्यांनी फोन दुरुस्त केले. यानंतर रिफिट ग्लोबलने विविध कंपन्यांना हे फोन विकले.
रिफिट ग्लोबल कंपनीविषयी सांगायचं झालं तर ही कंपनी फोनची गुणवत्ता ३७ पॉइंट्सवर तपासते आणि फोनला पूर्ण दुरुस्त करून तो मार्केटमध्ये पुन्हा विकते. मोबाईल फोन व्यतिरिक्त कंपनी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुरुस्ती आणि नूतनीकरणदेखील करते. या कंपनीचे ८० टक्के फोन हे फ्लिपकार्टवर विकले जातात. इतकंच नाहीतर इतर साईट्सवरही कंपनीच्या २० टक्के फोन्सची विक्री होते.
गेल्या वर्षी रिफिट ग्लोबल कंपनीने ५ लाख जुने मोबाईल विकले आहेत. साकेतने सांगितलं की त्यांनी दुरुस्त केलेले फोन हे नवीन मोबाईल्सच्या तुलनेत ७० टक्क्यांनी स्वस्त आहेत. हे फोन सेकंड हँड वस्तू विकणाऱ्या दुकानांमध्ये विकले जातात आणि ते ग्राहकांच्या फायद्याचेही आहेत. यामुळे या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीला ३५० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
[ad_2]