Maharashtra News Nashik News During Rainy Season, Not Single Pothole In Nashik City , Claims By Nmc

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Potholes : नाशिककर (Nashik) आणि खड्डे (Potholes) हा विषय पावसाळा आला कि चांगलाच गाजतो. मात्र यंदा पावसाळ्याच्या (Rainy Season) दृष्टीने नाशिककरांसाठी आता एक आनंदाची बातमी असून नाशिककरांचा प्रवास सुखकर होणार असून पावसाळ्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा खड्ड्यांपासून सुटका मिळणार असून प्रवासात दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. 

कोणत्याही क्षणी मान्सूनचा पाऊस नाशिक शहरात (Nashik City) बरसणार असून तत्पूर्वी शहरातील खड्डे बुजविणे महत्वाचे आहे. अन्यथा मागील वर्षी ज्या पद्धतीने नाशिक शहरात खड्ड्यांनी साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे नाशिककरांची कंबरडे मोडले होते. यंदा मात्र नाशिककरांच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिकेने कम्बर कसली असून आतापर्यंत 80 टक्क्यांहून अधिक खड्डे बुजविण्याचे आल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून (Nashik NMC) सांगण्यात आले आहे. शहरातील मुख्य भागांसह ठिकठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून यंदा नाशिककरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही, याची संपूर्ण दक्षता नाशिक महानगर पालिकेकडून घेण्यात येत आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात नाशिक (Nashik) शहरवासियांना खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच तासाभराच्या पावसानेच शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळत असते. मात्र यंदा पावसाळ्यात नाशिककरांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही, खड्ड्यांचे पॅच वर्क हे पूर्ण झाले असून काही तक्रारी आल्यास तात्काळ त्यावर उपाययोजना केल्या जातील. यासोबतच नालेसफाई आणि ईतर पावसाळापूर्व कामे देखील 85 टक्के पूर्ण झाली असून या आठवडाभरात सर्व कामं पूर्ण होतील, असा दावा महापालिकेकडून करण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यात नाशिक तुंबणार नाही, अशी आशा नाशिककरांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

यंदा महापालिका ऍक्शन मोडवर 

दरम्यान मागील वर्षी नाशिककरांना खड्ड्यांनी हैराण केले होते. यामुळे नाशिककरांकडून अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती. वेळोवेळी आंदोलने करूनही मनपाकडून जसे खड्डे बुजवले जात असायचे. पुढच्या काही दिवसांत पुन्हा खड्डे डोके वर काढत असत. यामुळे महापालिकेसह नागरिक देखील बेजार झाले होते. काही नाशिककरांनी तर स्मार्ट खड्डे काव्य संमेलन भरवून महापालिकेच्या कामाचा निषेधही केला होता. मात्र यंदा या सर्व गोष्टी टाळण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून नालेसफाईच्या कामांचा जोरदार सपाटा लावला आहे. त्यामुळे यंदातरी नाशिककरांना खड्ड्यापासून मुक्तता मिळेल, अशी शक्यता आहे. 

[ad_2]

Related posts