IPL 2023 DC Won The Match By 15 Runs Against PBKS In Match 64 At HPCA Stadium 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023, PBKS vs DC : दिल्लीने पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ आठ विकेटच्या मोबद्लयात 198 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकीही झुंज दिली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय अथर्व तायडे यानेही संयमी अर्धशतक झळकावले. दिल्लीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. दिल्लीचा संघ 10 गुणावर पोहचलाय. दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे  प्लेऑफचे आव्हान खडतर झालेय. पंजाबचा एक सामना बाकी आहे, त्या सामन्यात जरी विजय मिळवला तरी ते 14 गुणांपर्यंत मजल मारतील. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर पंजाबचे प्लेऑफचे आव्हान अवलंबून असेल.

214 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली.  कर्णधार शिखर धवन शून्यावर बाद झाला. अमन खान याने धवनचा जबराट झेल घेतला. कर्णधार माघारी परतल्यानंतर युवा अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी पंजाबचा डाव सावरला. दोघांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. 33 चेंडूत 50 धावांची भागिदारी करत पंजाबचा डाव सावरला. प्रभसिमरन याने 19 चेंडूत 22 धावांची खेळी केली. या खेळीत प्रभसिमरन याने चार चौकार लगावले. 

प्रभसिमर बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि अथर्व तायडे यांनी डाव सावरला. अथर्व याने संयमी फलंदाजी केली तर दुसरीकडे लियाम याने धावांचा पाऊस पाडला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अथर्व तायडे आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी 50 चेंडूत  78 धावांची भागिदारी केली. अथर्व तायडे रिटायर्ट बाद होत तंबूत परतला. अथर्व तायडे याने 42 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. अथर्व बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी ढेपाळली. पण दुसऱ्या बाजूला लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकी फटकेबाजी केली. 

जितेश शर्मा याला खातेही उघडता आले नाही. शाहरुख खान सहा धावा काढून बाद झाला. सॅम करन 11 धावांवर तंबूत परतला. हरप्रीत ब्रार शून्यावर धावबाद झाला… राहुल  चहर शून्यावर नाबाद राहिलाय. लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकी झुंज दिली… लियाम लिव्हिंगस्टोन याने अखेरच्या चेंडूपर्यंत लढा दिला. लियाम लिव्हिंगस्टोन याने 48 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 9 षटकार आणि पाच चौकार लगावले. 

दिल्लीकडून ईशांत शर्मा आणि एनरिख नॉर्किया यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. खलील अहदम आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

[ad_2]

Related posts