[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सेठी यांनी या मुलाखतीत आशिया कपच्या पाकिस्तानातील संयोजनास भारताकडून होत असलेल्या विरोधावरून टीका केली. मात्र त्याचवेळी भारताविरुद्धच्या मालिकेचीही संकल्पना मांडली. भारत आणि पाकिस्तानमध्ये २०१३ पासून एकही मालिका झालेली नाही. तर दोन देशातील अखेरची २००७च्या डिसेंबरमध्ये झाली आहे.
यंदा आशिया कप आणि वर्ल्ड कप या दोन महत्त्वाच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होईल. मात्र आशिया कप अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. त्याचवेळी पाकिस्तान भारतातील वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा विचार करीत असल्याचे सांगत आहेत. “नजिकच्या दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळवण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी अद्याप तयार नाही,” असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
एकिकडे विश्वचषक आणि आशिया चषक यांच्यातील घोळ सुरु आहे. त्यामध्ये आता पाकिस्तानने भारताबरोबर कसोटी मालिका खेळण्याचे खुळ काढले आहे. त्यामुळे आता त्यांचा हा नवीन कोणता डाव आहे, हे बीसीसीआय जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल. पण दुसरीकडे भारताबरोबर खेळण्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ उतावीळ झाले आहे. या सर्व गोष्टींमध्ये काही आर्थिक गोष्टीही आहेत आणि त्यामुळेच पाकिस्तान भारताबरोबर खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी त्यांनी त्रयस्थ ठिकाणांचा पर्यायही सुचवला आहे.
[ad_2]