Good News For Indian Team, Jasprit Bumrah Will Make A Comeback, भारतीय संघासाठी आली आता गुड न्यूज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय क्रिकेट संघात परतण्याची शक्यता आहे. या टी-२० मालिकेसाठी त्याची निवड करून त्याची तंदुरुस्त चाचणी होण्याची शक्यता आहे. एका वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला बुमराह वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी पूर्ण बहरात असावा ही भारतीय संघाची अपेक्षा आहे.भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली; मात्र त्याचवेळी टी-२० संघांची निवड लांबवली आहे. ही मालिका २ ते १३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी बुमराहला खेळवण्याचा विचार सुरू आहे; मात्र त्यांच्या संघसमावेशाची घाई न करता आयर्लंडविरुद्धची मालिका पुनरागमनासाठी योग्य ठरेल, या मतास जास्त पुष्टी मिळत आहे. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघव्यवस्थापनास बुमराह आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत. त्यापूर्वी तो आशिया कप स्पर्धेत खेळल्यासही ते संघासाठी उपयुक्त ठरणार आहे; मात्र थेट वन-डे लढतीत खेळवण्यापूर्वी चार षटकांची मर्यादा असलेल्या टी-२० मध्ये खेळणे बुमराहसाठी उपयुक्त ठरेल, असे वैद्यकीय समितीचे मत आहे.

गतवर्षीच्या सप्टेंबरपासून बुमराह भारतीय संघाबाहेर आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. तो सध्या ७० टक्के तंदुरुस्त आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकेल, असा विश्वास भारतीय संघव्यवस्थापनास आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील लढती १८, २० आणि २३ ऑगस्टला होणार आहेत. बुमराहची सामना तंदुरुस्ती जाणून घेण्यासाठी पुढील महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही सराव सामने घेण्यात येतील. या सामन्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या भारतीय संघातील निवडीबाबत विचार होईल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

राहुलवरील पुनर्वसन प्रक्रिया सुरू लोकेश राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. त्याच्यावर मे महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्यावरील पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र तो आशिया कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. श्रेयस अय्यरवर उपचार सुरू आहेत, एवढेच सूत्रांनी सांगितले.

[ad_2]

Related posts