BCCI’s Buzz About Asian games 2023 ; आशियाई क्रीडा स्पर्धेबाबत बीसीसीआयचे घुमजाव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघाच्या सहभागाबाबत अचानक घूमजाव केले असल्याचे समजते. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असल्याचे वृत्त आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-२० स्वरुपाची आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच भारतातील वर्ल्ड कप वन-डे क्रिकेट स्पर्धेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दुय्यम संघ सहभागी होईल; मात्र महिलांच्या स्पर्धेत अव्वल संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान होईल, तर वर्ल्ड कप वन-डे स्पर्धा ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अंतिम संघ पाठवण्यासाठी राष्ट्रीय संघटनांना ३० जूनची मुदत दिली आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट बोर्ड ३० जूनपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघांची घोषणा करणार आहे. यामुळे आशियाई क्रीडामधील क्रिकेट स्पर्धेत भारताचा प्रथमच सहभाग असेल. यापूर्वी २०१० आणि २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होता; मात्र त्या वेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने संघ पाठवण्यास नकार दिला होता. आशियाई क्रीडा स्पर्धा पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार गतवर्षी होणार होती; पण आता ती करोनामुळे यंदा होणार आहे. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धत क्रिकेटला स्थान नव्हते; पण यंदाच्या एशियाडमध्ये क्रिकेटचाही समावेश आहे.

आमचा कार्यक्रम यापूर्वीच निश्चित झालेला आहे, असे कारण भारतीय क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच्या बहुविध स्पर्धांतील सहभागास नकार देताना दिले होते. भारताच्या महिला संघाने गतवर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. १९९८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा पुरुष क्रिकेट संघ गटसाखळीत तिसरा आला होता. लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

‘क्रिकेटव्यतिरीक्त जवळपास अन्य सर्व क्रीडा प्रकारांत भारताचा सहभाग असेल. भारतीय क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रीडा स्पर्धेपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. आम्ही स्पर्धेसाठी खेळाडूंच्या प्रवेशिका पाठवण्याबाबत प्रत्येक क्रीडा संघटनेस सांगितले होते; तसेच बीसीसीआयलाही सांगितले होते. तीन-चार इमेल पाठवूनही बीसीसीआयने एकाही इ-मेलला उत्तर दिलेले नाही,’ असे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असलेल्या भारतीय पथकाचे पथकप्रमुख भूपेंदर बाजवा यांनी सांगितले होते.

[ad_2]

Related posts