Why Umesh Yadav And Cheteshwar Pujara Dropped From Test Team For IND vs WI Series; उमेश यादव आणि चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळले नाही…. BCCI चा भलताच सूर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया तिथे फक्त कसोटीच खेळणार नाही तर ३ वनडे आणि ५ टी-२० सामनेही खेळणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कॅरेबियन दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषत: कसोटीत, संघाचे २ सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर निवड झालेली नाही. यामागचे मोठे कारण समोर आले आहे.

पुजारा आणि उमेश कसोटी संघातून वगळले नाहीत

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज उमेश यादवला डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवानंतर वगळण्यात आले नाही. उलट तो जखमी झाला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बरा होत आहे. हि माहिती बीसीसीआयच्या एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.

सध्या तरी या दोन्ही सिनियर खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. दोघांची कामगिरी टीम इंडियासाठी उत्कृष्ट ठरली आहे. बीएसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘१५ महिन्यांसाठी वगळल्यानंतर अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा उपकर्णधार बनू शकतो, तर कोणीही पुनरागमन करू शकतो. ते पुढे म्हणाले, ‘तुम्हाला कुठेतरी बदलाची सुरुवात करायची आहे. निवडकर्त्यांना अशी परिस्थिती नको आहे की सर्व सीनियर एकाच वेळी मैदान सोडतील आणि ड्रेसिंग रूममध्ये अनुभवी खेळाडू नसतील.’

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

T20 संघात रिंकू सिंगची एन्ट्री

आयपीएल २०२३ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण करणाऱ्या रिंकू सिंगला वेस्ट इंडिजविरुद्ध संघात संधी मिळू शकते. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याची निवड होऊ शकते. रिंकूने आयपीएल २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांमध्ये ५९.२५ च्या सरासरीने त्याने ४७४ धावा केल्या होत्या. या मोसमात त्याच्या नावावर ४ अर्धशतकेही आहेत. यूपीचा रिंकू लवकरच भारतासाठी पदार्पण करू शकतो.

[ad_2]

Related posts