Team India Will Win Icc World Cup Trophy 2023 Reached In Space Icc Share Video On Instagram

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup Trophy : आज आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा मुंबईत करण्यात आली. मंगळवार 27 जूनपासून ही स्पर्धा सुरू होण्याकरता 100 दिवसांचं काऊंटडाऊन सुरू झाल्यानं आयसीसीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आजपासून जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या भेटीसाठी ट्रॉफीचा प्रवास सुरू होणार आहे.

भारताच्या सर्व प्रमुख शहरांसह यंदा प्रथमच ट्रॉफी देशाच्या ईशान्येकडील राज्यांत वसलेल्या गुवाहाटी इथंही नेली जाणार आहे. 27 जून ते 14 जुलै देशभरातील प्रमुख शहरांचा प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी परदेश दौऱ्याकरता रवाना होईल. 14 जुलैपासून भारतासह क्रिकेट खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्या काही निवडक देशांसह संपूर्ण जगाचा प्रवास करून ही ट्रॉफी 4 सप्टेंबरला पुन्हा भारतात येईल. 

अंतराळात विश्वचषकाच्या ट्रॉफीचं अनावरण 

विश्वचषकाच्या ट्रॉफीचं अनावरण यंदा अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं. भारतीय भूमीवर खेळल्या जाणार्‍या ICC विश्वचषक 2023 ची ट्रॉफी लाँच करण्यात आली. विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण अवकाशात करण्यात आलं. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. शाह यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रॉफी अवकाशात लॉन्च होतानाचा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळत आहे. 

भारतातील 10 स्टेडियम्समध्ये खेळवले जाणार विश्वचषकाचे सामने

भारतातील 10 स्टेडियममध्ये यंदाच्या विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 5 ऑक्टोबरला गतवेळचे फायनलिस्ट न्यूझीलंड सध्याचे वर्ल्ड चैम्पियन असलेल्या इंग्लंडशी भिडतील. त्यानंतर दीड महिन्यांच्या स्पर्धेनंतर 19 नोव्हेंबरला याच स्टेडियमवर वर्ल्डकपची फायनल खेळवली जाईल. त्याआधी 15 नोव्हेंबरची पहिली सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तर 16 नोव्हेंबरची दुसरी सेमीफायनल कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जाईल. आणि स्पर्धेच्या पहिल्या टप्यात 15 ऑक्टोबर रोजी तमाम भारतीयांसह संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेला भारत पाकिस्तान हा महामुकाबला होईल.

 

आणखी वाचा : 

World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती

Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने

पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

ICC World Cup 2023 Schedule : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

Round-robin Format : राउंड रॉबिन पद्धतीने होणार यंदाचा विश्वचषक, जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल संपूर्ण माहिती

ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका – वीरेंद्र सेहवाग



[ad_2]

Related posts