Chess grandmaster Praggnanandhaa thankful for PM Modi Advice;ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi and R Praggnanandhaa Meeting: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यापासून तो सेलिब्रिटी बनला आहे.
अंतिम सामन्यात तो सध्याच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला. असे असले तरी त्याच्या या स्पर्धेतील प्रभावी खेळीमुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील टूर्नामेंट दरम्यान सोशल मीडियावर तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे अनेक वेळा कौतुक केले. तसेच त्यांनी  प्रज्ञानंध आणि त्याच्या पालकांची भेट घेतली होती. या भेटीत काय झाले होते? याची सविस्तर माहिती प्रज्ञानंदने 4 दिवसांनंतर दिली आहे.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर प्रज्ञानंदने X वर पोस्ट केले होते.

यावेळी ते पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. पंतप्रधानांना त्यांच्या निवासस्थानी भेटणे हा एक मोठा सन्मान होता. माझ्या आणि माझ्या पालकांसाठी प्रोत्साहनाच्या सर्व शब्दांबद्दल धन्यवाद सर, अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान प्रज्ञानंदच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याने मोदींच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

तू पंतप्रधान मोदींना भेटलास. या भेटीत नेमकं काय झालं? तुला पंतप्रधानांनी काय सांगितलं? असा प्रश्न पत्रकारांनी प्रज्ञानंदला विचारला. यावर त्याने उत्तर दिले.

पंतप्रधान मोदी यांनी मला माझ्या ट्रेनिंगबद्दल विचारले. त्यांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून मला खूप आनंद झाला. त्यांनी मला काही सल्ले दिले. त्यांच्या शुभेच्छा आणि सहकार्याने मी भारावून गेल्याचे प्रज्ञानंद याने सांगितले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रज्ञानंदच्या भेटीनंतर ट्वीट केले होते.

तूला तुझ्या कुटुंबासह भेटून खूप आनंद झाला. तू उत्कटतेचे आणि चिकाटीचे प्रतीक आहेस. भारतातील तरुण कोणत्याही परिस्थितीत कसे नेतृत्व करू शकतात, हे तुमच्याकडून पाहून दिसून येते. तुझा अभिमान आहे, असेही ते म्हणाले. 

Related posts