Pune Crime News Pune Police Work Friend Attack On His Women Friend At Pune Sadashiv Peth Darshana Pawar Murder Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्रानं कोयत्याने हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखलं. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळं पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलीस नक्की करतायत काय?, असा प्रश्न पुणेकर विचारत आहे.

Pune Crime news : नेमकं काय घडलं?

सदाशिव पेठेत सकाळी दहा वाजता झालेल्या या हल्ल्यानं सगळ्यांचाच थरकाप उडाला. जिवाच्या आकांतानं धावणारी तरुणी आणि तिच्या मागे कोयता घेऊन लागलेला शंतनू जाधव नावाचा तरुण पाहून सुरुवातीला काय होतंय हे अनेकांना समजलंच नाही. कोयत्याच्या घावाने जखमी झालेल्या तरुणीने पुन्हा पुढं धावण्याचा प्रयत्न केला पण ती खाली पडली. शंतनू आणखी एक घाव तिच्यावर घालणार एवढ्यात लेशपाल जवळगे नावाचा तरुण पुढं आला आणि त्यानं कोयता पकडला. त्यानंतर इतर लोकही मदतीसाठी धावले आणि त्यांनी शंतनूच्या तावडीतून या तरुणीला दूर नेलं. या हल्ल्यात केवळ नशीब म्हणून ही तरुणी वाचली. गेल्या काही दिवसांपासून शंतनू जाधव आपल्याला त्रास देत होता. याची कल्पना त्याच्या घरच्यांना देऊनही फरक पडत नव्हता, असं या तरुणीचं आणि तिच्या आईच म्हणणं आहे. 

Pune Crime news : पुण्यात नक्की चाललंय तरी काय?, पुणेकरांचा प्रश्न

सकाळी दहा वाजता गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्यानं पुण्यात नक्की चाललंय तरी काय?, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत. कारण कोयता गॅंग कडून होणारे हल्ले आणि वाहनांची तोडफोड ही पुण्यात नित्याची बाब झाली आहे. सदाशिव पेठेत ही घटना घडल्यानंतर देखील बराच वेळ हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीत पोलिसच नव्हते, शेवटी लोकच आरोपीला पोलीस चौकीत घेऊन गेले. 

Pune Crime news : मैत्री तोडली अन् तरुण चिडला थेट हल्लाच केला…

ज्या तरुणीवर हल्ला झाला ती तरुणी आणि हल्ला करणारा शंतनू जाधव हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघेही शिक्षण घेत घेत एमपीएससीची तयारी करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी या मुलीने शंतनू सोबतची मैत्री संपुष्टात आणल्यानं तो तिच्यावर चिडून होता. त्यातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. मात्र हे असे प्रकार पोलिसांचा जरब न उरल्यानं पुण्यातील शाळा, महाविद्यालयं आणि अभ्यासिकांच्या परिसरात सातत्यानं घडतायत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. 

Pune Crime news :पोलिसांचा धाकच नाही?

दर्शना पवारच्या हत्येला काही दिवसच झालेले असताना पुण्यात पुन्हा तशीच घटना घडल्यानं पुण्यातील तरुणाई आणि  एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वात नक्की काय चाललंय,  असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. दर्शना पवारवर हल्ला करणारा राहुल हंडोरे असेल किंवा सदाशिव पेठेत घडलेल्या घटनेतील हल्लेखोर शंतनू जाधव दोघांनीही हल्ला करायचं नियोजन आधीच केलेलं होतं. रागाच्या भरात घडलेल्या या घटना नाहीत. त्यामुळं हे असं का होतंय याचा विचार तरुण आणि तरुणींनी करायचा आहे त्यांच्या पालकांनी करायचं आहे आणि त्याचबरोबर पुण्यात सार्वजनिक ठिकाणी सतत होणाऱ्या कोयता हल्ल्याच्या घटना पाहून आपला थोडातरी धाक उरलाय का? याच आत्मपरीक्षण पुणे पोलिसांनी करायचं आहे. 

[ad_2]

Related posts