World Cup 2023 Trophy Launched In 1.20 Lakh Feet Above Earth BCCI Chief Jay Shah Shares Video; वर्ल्डकप ट्रॉफीची अंतराळवारी! १.२० लाख फुटावर दिमाखदार चषक लाँच

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दुबई: भारतात होणार्‍या आयसीसी विश्वचषक २०२३ आधी ट्रॉफी लाँच करण्यात आली आहे. यानंतर आता ही ट्रॉफी १८ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण त्यापूर्वी ही ट्रॉफी पृथ्वीपासून एक लाख २० हजार फूट उंचीवर स्ट्रॅटोस्फियरमध्ये सोडण्यात आले आणि तिथे ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यंदाच्या विश्वचषकाची ट्रॉफी एका खास स्ट्रॅटोस्फेरिक बलूनला जोडण्यात आली होती. 4K कॅमेऱ्यांनी पृथ्वीच्या वातावरणाच्या काठावर ट्रॉफीची काही आकर्षक छायाचित्रे टिपली. पहिल्यांदाच क्रीडा ट्रॉफीला अंतराळात पाठवण्यात आले. यंदाचा वर्ल्डकप २०२३ ऑकटोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि याचे वेळापत्रकही आज जाहीर करण्यात येत आहे.

१८ देशांमध्ये जाणार ट्रॉफी

ट्रॉफीचा २०२३ चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असेल, ज्यामध्ये चाहत्यांना जगभरातील विविध देश आणि शहरांमधील प्रतिष्ठित ट्रॉफीशी कनेक्ट होण्याची संधी मिळेल. ICC प्रकाशनानुसार, २७ जूनपासून ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी यजमान भारत, कुवेत, बहरीन, मलेशिया, यूएसए, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली, यूएसए यासह १८ देशांमध्ये प्रवास करेल. या दौऱ्यात देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे दहा लाख चाहत्यांना ट्रॉफी पाहण्याची संधी मिळेल.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, “आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी दौरा हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गणतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले, ‘या दौऱ्यावर ट्रॉफी राष्ट्राध्यक्षांना भेटेल. सामुदायिक उपक्रम सुरू करेल आणि जगभरातील काही सर्वात प्रतिष्ठित स्थळांना भेट देण्याव्यतिरिक्त क्रिकेट विकास कार्यक्रमांचे समर्थन करेल.”
भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह म्हणाले, “भारताला क्रिकेटसारखे एकत्र आणणारे दुसरे काहीही नाही आणि देशभरात उत्साह निर्माण होत आहे कारण आम्ही जगातील १० सर्वोत्तम संघांना सहा आठवड्यांच्या अटीतटीच्या क्रिकेटसाठी एकत्र आणत आहोत.” ट्रॉफी टूर ही चाहत्यांसाठी कार्यक्रमाचा भाग बनण्याची एक उत्तम संधी आहे. ट्रॉफीचा दौरा भारतात २७ जूनपासून सुरू होईल आणि जगभर फिरल्यानंतर ४ सप्टेंबरला ट्रॉफी यजमान राष्ट्राकडे परत येईल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

[ad_2]

Related posts