Ipl 2023 Play Off Scenario Punjab Kings Almost Out Of The Race Know Others Teams Qualification Equation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Playoff Equation: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमधील चार संघांचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्पर्धेत फक्त 6 साखळी सामने शिल्लक आहेत. बुधवारी, 17 मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं विजय नोंदवून पंजाबच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आणल्या. आता पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेलच, मात्र इतर संघांच्या खेळावरही लक्ष ठेवावं लागेल. 

गुजरातशिवाय कोणत्या संघांना पात्र ठरण्याची संधी?

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) : चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघ आपला शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध खेळणार असून हा सामना जिंकून चेन्नई थेट प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जर संघ हा सामना हरला तर पात्र होण्यासाठी त्यांना लखनौ, मुंबई आणि बंगळुरूच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) : लखनौचा संघ पॉईंट टेबलमध्ये 15 गणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ केकेआरच्या विरोधात साखळी सामन्याचा शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये जाण्याच्या प्रयत्नात लखनौ दिसेल, मात्र जर लखनौचा पराभव झाला तर मात्र लखनौला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. 

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) : मुंबईला टॉप-4 मध्ये जागा बनवण्यासाठी हैदराबादच्या विरोधातील सामन्यात जिंकावंच लागेल. याव्यतिरिक्त मुंबईला आरसीबीनं कमीत कमी एक सामना हरावा यासाठीही प्रार्थना करावी लागेल. मुंबई पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) : आरसीबी पॉईंट टेबलमध्ये 12 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. अजुनही दोन साखळी सामने शिल्लक आहेत. बंगळुरूला प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय होण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर आरसीबीनं दोन्ही सामने जिंकले तर आरसीबी थेट पॉईंट टेबलमध्ये टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी मुंबईचा अखेरच्या साखळी सामन्यात पराभव व्हावा, अशी प्रार्थना करावी लागेल. 

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) : राजस्थान 13 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला शेवटचा सामना कोणत्या परिस्थितीत जिंकावाच लागेल. तसेच, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि पंजाब या संघांकडून सर्व सामन्यांत पराभूक होण्याची अपेक्षा करावी लागेल. याशिवाय संघाला चांगल्या नेट रनरेचीही गरज आहे. 

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) : कोलकाताचा संघ 13 सामन्यांत 12 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या तिकिटासाठी संघाला शेवटचा सामना जिंकावा लागेल, तसेच मुंबई, बंगळुरू, राजस्थान आणि पंजाब या संघांचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. यासोबतच संघाला चांगल्या नेट रनरेटचीही गरज असेल.

पंजाब किंग्स (Punjab Kings)  : पंजाबला टॉप-4 मध्ये जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. संघ 13 सामन्यांत 12 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. संघाला शेवटच्या सामन्यातील विजयासह उर्वरित संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल आणि त्यांच्या संघाला चांगल्या नेट रनरेटची देखील आवश्यकता असेल.

दरम्यान, पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि दहाव्या क्रमांकावर असलेला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहेत, म्हणजेच दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

DC Vs PBKS: दिल्लीचा पंजाबवर विजय, पण आधीच झालेत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, मग कालच्या विजयानं नेमकं मिळालं तरी काय?

[ad_2]

Related posts