Ashes ENG vs AUS Some Protestors Enters On The Field And Jonny Bairstow Carried Out Pitch Invaders Watch Video; लॉर्ड्सवर मोठा गदारोळ! सामना सुरु असतानाच मैदानात घुसले आंदोलक, बेअरस्टोने उचलून बाहेर काढले | Maharashtra Times

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. पहिला सामना अखेरच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाने जिंकला. क्रिकेटचा मक्का असलेल्या लॉर्ड्सवर हा सामना खेळवला जात आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना सुरू होताच लॉर्ड्सच्या मैदानावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. काही आदोलकांनी सामना सुरु झाल्यानंतर भर मैदानात येत गोंधळ घालायला सुरुवात केली. जस्ट स्टॉप ऑइल ग्रुपचे अनेक आंदोलक दुसरे षटक सुरू होण्यापूर्वी मैदानात घुसले.

बेअरस्टोने त्याला मैदानातून बाहेर काढले

असे आंदोलक क्रिकेटच्या मैदानात घुसत राहतात. परंतु कधीकधी खेळाडू त्यांच्यापासून दूर राहतात. सुरक्षा कर्मचारी त्यांना पकडून मैदानाबाहेर काढतात. यावेळी काहीतरी वेगळे पाहायला मिळाले. इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो एका आंदोलकाला उचलून सरळ मैदानातून बाहेर घेऊन गेला. ज्याचा फोटो चांगलंच व्हायरल होत आहे.

त्यांच्या हातात केशरी रंगाची पावडरही होती. त्याने ती पावडर बेअरस्टोवर फेकली, त्यामुळे त्याचे कपडेही खराब झाले. ते बदलण्यासाठी तो परत ड्रेसिंग रूममध्ये गेला. यामुळे बराच वेळ सामना थांबला होता. तर काहींना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मैदानाबाहेर काढले. यादरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही आंदोलकांना खेळपट्टीवर जाण्यापासून रोखताना दिसले.

जस्ट स्टॉप ऑइल ग्रुप नेमकं आहे तरी काय?

जस्ट स्टॉप ऑइल हा यूकेमधील पर्यावरण कार्यकर्ता गट आहे. ब्रिटीश सरकारला नवीन तेल परवाने देण्यापासून रोखणे हे त्यांचे ध्येय आहे. या गटाची स्थापना फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली आणि एप्रिल २०२२ मध्ये इंग्रजी तेल टर्मिनल्सवर त्यांनी निषेध सुरू झाला. त्यांनी ज्या प्रकारे निषेध केला त्याबद्दल या गटावर टीका केली जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यानही हा गट मैदानात उतरण्याची शक्यता होती. त्या वेळी असे काहीही घडले नाही. पण यावेळी त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्याचा फायदा उचलला.

[ad_2]

Related posts