Virender Sehwag On Prithvi Shaw And Shubman Gill Shares His Story With Sunil Gavaskar; आम्ही ६ तास एकत्र होतो, पण त्याने क्रिकेटवर चर्चा केली नाही; विरेंद्र सेहवागचं पृथ्वी शॉवर मोठं विधान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पृथ्वी शॉ आयपीएल २०२३ मध्ये खास कामगिरी करू शकला नाही. मात्र बुधवारी झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक केलं. त्याची सतत कधी संघात तर कधी संघाबाहेर अशी स्थिती आहे. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली असतानाही पृथ्वी शॉ अनेक सामन्यांमध्ये डगआउटमध्ये बसलेला दिसला. शुभमन गिलशिवाय ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांच्यापेक्षाही पृथ्वी मागे असल्याचं मानलं जात आहे. आता भारतीय माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी पृथ्वी शॉबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.पृथ्वीने धर्मशालामध्ये पंजाब किंग्सविरुद्ध सामन्यात अर्धशतक केलं. त्याने ३८ चेंडूमध्ये ५४ धावा केल्या. दिल्लीच्या विजयात पृथ्वीची मोठी भूमिका होती. शॉबाबत बोलताना दिल्लीचे माजी कर्णधार सेहवाग यांनी केलेल्या संवादाबाबत सांगितलं.

माजी भारतीय फलंदाजाने २००३-०४ या वर्षातील दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना भेटण्याचा एक किस्साही शेअर केला. त्यांनी सांगितलं, की पृथ्वी शॉने माझ्यासोबत एका जाहिरातीचं शूट केलं होतं. शुभमन गिलदेखील तिथे होता. त्यापैकी एकानेही एकदाही क्रिकेटबाबत चर्चा केली नाही. आम्ही त्याठिकाणी ६ तास होतो.

जर तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे, तर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. ज्यावेळी मी संघात नवीन होतो, त्यावेळी मला सुनील गावस्कर यांच्याशी बोलायचं असायचं. त्यावेळी मी जॉन राइट यांना सांगितलेलं, की मी नवा खेळाडू आहे, सुनील गावस्कर मला भेटतील की नाही मला माहित नाही, पण तुम्ही त्यासाठी नियोजन करा, असं सांगितलं असल्याची आठवण सेहवागने सांगितली.

१६ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात घेतलं, तोच स्टोक्स CSK ला पडला महागात !

त्यानंतर सेहवागने सांगितलं, की राइटने माझ्यासाठी २००३-०४ मध्ये डिनरचं आयोजन केलं आणि मी त्याला माझ्यासोबत आकाश चोपडापण येईल असं सांगितलं. जेणेकरुन आम्ही क्रिकेटबाबत, फलंदाजीबाबत बोलू शकू. त्यानंतर आम्ही सुनील गावस्कर यांच्यासोबत जेवण केलं. तुम्हाला स्वत:ला यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुनील गावस्कर तुमच्याकडे येणार नाहीत, त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील असंही सेहवानने सांगितलं.

सेहवागने सांगितलं, जर शॉने बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर मला खात्री आहे की कोणीतरी करेल…तो दिल्लीसाठी खेळत आहे त्यामुळे त्याला जर बोलायचं असेल तर त्याने दिल्लीच्या सीओओला विनंती करावी. तुम्ही क्रिकेटमध्ये कितीही प्रतिभावान असलात तरी जर तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट नसाल तर तुमचं काहीही होऊ शकत नाही.

[ad_2]

Related posts