Agriculture News Tomato Price Rise Know Why Prices Of Tomato Have Increased What Is The Reason

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tomato Price Rise : सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato Price Rise) झाली आहे. देशातील अनेक भागात टोमॅटोचा दर हा 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर काही ठिकाणी 80 ते 90 रुपये किलोपर्यंत टोमॅटोचा दर पोहोचला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या टोमॅटोचे पीक आहे, त्यांना या वाढत्या दराचा चांगला फायदा होत आहे. दरम्यान, टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय ते पाहुयात…

दर वाढण्याची नेमकी कारणं काय?

टोमॅटोचे दर वाढण्याची अनेक कारणं आहेत. पहिले कारण म्हणजे तापमानात झालेली वाढ. देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात कडक ऊन होते. या उन्हाचा पिकावर मोठा परिणाम झाला असून मोठं नुकसान झालं आहे. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. दुसरे कारण म्हणजे यावेळी झालेलं टोमॅटोचे कमी उत्पादन. टोमॅटोचे उत्पादन कमी आणि मागणी वाढली आहे, याचा परिणाम दर वाढण्यावर झाला आहे. त्याचबरोबर देशात पावसाचे उशिरा झालेले आगमन, यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ जाली आहे. गेल्या महिन्यातच टोमॅटोचे दर 25 रुपये किलोपर्यंत होते. मात्र जून महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर हे 70 ते 80 रुपयांवर गेले आहेत. 

पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान 

उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. आता टोमॅटो बेंगळुरुहून आयात केली जात आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं दरात वाढ झाल्याची माहिती दिल्लीच्या आझादपूर घाऊक बाजारातील टोमॅटो व्यापाऱ्यांनी  दिली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता जाणवत नाही. पुढच्या काही दिवसात टोमॅटोचे नवीन पीक बाजारात येणार आहे. पण हिमाचल प्रदेश किंवा अन्य उत्पादक प्रदेशात जोरदार पाऊस झाला तर टोमॅटोचे दर असेच वाढत राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आंध्र प्रदेशसह तामिळनाडू आणि तेलंगणातून टोमॅटोची आयात

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडे टोमॅटो बाजारात येणं बंद झाले आहे. या भागातील गृहिणी आणि ग्राहकांना लागणाऱ्या टोमॅटोचा पुरवठा करता यावा यासाठी आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात टोमॅटोची आयात होत आहे. एकट्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज 10 हजार कॅरेट टोमॅटोची गरज आहे. मात्र, पाकिस्तानातील निर्यात वाढल्यानं भंडारा जिल्ह्याला केवळ तीन हजार कॅरेट्स पुरवठा होत आहे. पाकिस्तानात टोमॅटो जात असल्यानं आणि पूर्व विदर्भातील मागणी बघता टोमॅटोचे दर प्रति कॅरेट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका कॅरेटला 300 रुपये मोजावे लागत होते, ते आता तब्बल 1700 रुपयांनी वाढले असल्याने प्रति किलोचा दरही 10 रुपयांवरून थेट 90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांच्या दरातही मोठ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Tomato : दिलासादायक! टोमॅटोच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना मिळतोय फायदा; पाकिस्तानमध्ये निर्यात वाढली 

[ad_2]

Related posts