Yashasvi Jaiswal Talks About Sledging After Entry In Team India For West Indies Tour ; आई-बहिणींवरुन शिवी ऐकून घेणार नाही, टीम इंडियात आल्यावर यशस्वी असं का म्हणाला पाहा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आयपीएल गाजवल्यावर यशस्वी जैस्वालची भारतीय संघात निवड झाली. पण भारतीय संघात निवड झाल्यावर यशस्वी जैस्वालने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये, आपण आई-बहिणींचा अपमान सहन करणार नाही, असे त्याने म्हटले आहे.

यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये विक्रम रचला होता. आयपीएलमध्ये त्याने धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे त्याची भरातीय संघात निवड करण्यात आली. आता यशस्वीकडे भारताचा भरवश्याचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. ़कारण त्याला आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात तिसऱ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे यशस्वीसाठी ही मोठी संधी आहे. पण ही संधी मिळण्यापूर्वी आता यशस्वीने मोठे भाष्य केले आहे.

यशस्वी याबाबत म्हणाला की, ” क्रिकेटमध्ये आक्रमकता असते, काही प्रमाणात ती असायला पण हवी. पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. प्रत्येकाने या मर्यादेत राहायला हवे. क्रिकेटमध्ये स्लेजिंग होत असते. पण कोणी जर मला आई-बहिणींवरून शिव्या दिल्या किंवा स्लेजिंग केले तर ते मी खपवून घेणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या मर्यांदांचे पालन करायला हवे. “

यापूर्वी यशस्वीबाबत अशीच एक गोष्ट घडली होती. यशस्वी मैदानात चांगलाच आक्रमक झाला होता. ही गोष्ट घडली होती ती २०२२ साली. जेव्हा बीसीसीआयची दुलीप ट्रॉफी सुरु होती. यावेळी सामना सुरु होता तो पश्चिम आणि दक्षिण विभागात. त्यावेळी पश्चिम विभागाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता. हा सामना सुरु असताना यशस्वी हा सारखा दक्षिण विभागाच्या रवी तेजावर स्लेजिंग करत होता. १-२ वेळा ही गोष्ट घडली असती तर ठीक होते. पण यशस्वी सारखाच रवी तेजावर स्लेजिंग करत होता. ही गोष्ट अजिंकच्या लक्षात आली. त्यानंतर अजिंक्यने सामना सुरु असताना यशस्वीला मैदानाबाहेर केल्याचे पाहायला मिळाले. कारण क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. यामध्ये काही वेळा खेळाडू आक्रमक होत असतात. पण जर खेळाला बट्टा लागत असेल तर ती गोष्ट योग्य नसल्याचे अजिंक्यला जाणवले आणि त्यानंतर त्याने यशस्वीला थेट मैदानाबाहेर काढले होते. एक कर्णधार म्हणून अजिंक्यने त्याची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी अजिंक्य हा किती कडक शिस्तीची कर्णधार आहे, हे समोर आले होते. पण आपण असे का केले, या गोष्टीचा उहापोह यशस्वीने त्यानंतर केला. त्यानंतर आता यशस्वीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

यशस्वीची निवड सध्याच्या घडीला भारतीय संघात झाली आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts