Pune News Punekar Post On Social Media Goes Viral After Attack On Gorl In Sadashiv Peth

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News : दर्शना पवार हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला असतानाच पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने या तरुणीवरील हल्ला रोखला. यात तरुणीचा जीव वाचला. मात्र यातच लेशपालच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता.  त्यानंतर पुण्यात मुली किंवा महिला कितपत सुरक्षित आहे?, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर पुणं शहरावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पुण्यातील सुरक्षिततेवर टीका केली होती. मात्र या टीकेला पुणेकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात अलिकडे पुण्यात जे घडतंय त्याला पुणेकर अजिबात जबाबदार नाहीत, मुली बिनधास्त राहणे, पबमध्ये जाणे, दारु-सिगारेट पिणे, वेडेवाकडे कपडे परिधान करणे, रात्री मित्रांबरोबर पार्टी करणे असे अनेक प्रकार करतात, असं त्यात म्हटलं आहे.

Pune News : पोस्टमध्य़े नेमकं काय लिहिलंय?

‘मी पुणेकर, अलिकडे पुण्यात जे घडतंय त्याला पुणेकर अजिबात जबाबदार नाहीत. आज पुण्यात चांगले शिक्षण मिळते म्हणून भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. परंतु काही मुले-मुली सोडले तर खूपजण इथे वेगळेच उद्योग करु लागतात. मुली बिनधास्त राहणे, पबमध्ये जाणे, दारु-सिगारेट पिणे, वेडेवाकडे कपडे परिधान करणे रात्री मित्रांबरोबर पार्टी करणे असे अनेक प्रकार करतात. कारण पालक इथं नसतात. आणि मग प्रेमप्रकरणे केल्यावर काही अघटीत घडले की पुण्यात राहण्यावर प्रश्नचिन्ह करायचं. पण हे पुण्यात घडलं म्हणूनच ती मुलगी वाचली, दिल्लीत त्या घटनेत ती मुलगी मृत्यूमुखी पडली. हे पुणे आहे, इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट छाटली… तेव्हा पुण्याला ‘नावे ठेवण्याआधी आपले वंशज पुण्यात येऊन नक्की काय दिवे लावत आहे, हे नक्की पहा.. पुणेकर’.

 

Pune News : लेशपाल आणि बाकी सहकाऱ्यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार

लेशपाल आणि बाकी सहकाऱ्यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा शरद पवारांनी सत्कार केला. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही तिघांना पाच लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे. त्यासोबतच अनेक स्तरावरुन या तिघांचंही कौतुक केलं जात आहे. 

हेही वाचा-

Buldhana Accident : जॉब जॉईन करण्यासाठी पुण्यात येत होता; नोकरीचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच आयुष्याचा प्रवास संपला; आईनं फोडला टाहो…

[ad_2]

Related posts