अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार
राजभवनात दाखल झाले आहेत. 

अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा  अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.  राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार आजच राष्ट्रवादीला हादरा देणार का अशीही स्थिती आहे. आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी सुरु होती. या बैठकीनंतर अजित पवार काही आमदारांसह राजकारणाचे दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आजच शपथविधी होऊन काही मंत्री शपथ घेणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Related posts