World Sports Journalist Day 2023 Know History Significance Theme All You Need To Know News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Sports Journalist Day 2023 : जागतिक क्रीडा पत्रकार दिन (World Sports Journalists Day) दरवर्षी 2 जुलै रोजी साजर केला जातो. क्रीडा पत्रकारितेमध्ये पत्रकार खेळाशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रीत करतात. ते डिजिटल, प्रिंट आणि टेलिव्हिजन सारख्या विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करतात. जवळपास प्रत्येक स्थानिक किंवा राष्ट्रीय माध्यम संस्था क्रीडा पत्रकारितेत सक्रिय आहे. क्रीडा पत्रकारिता हा रिपोर्टिंगचा एक प्रकार आहे .

 जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात, आणि या खेळांशी संबंधित शेकडो किंवा हजारो स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये अनेक जण सहभागी होतात आणि स्पर्धा जिंकतात. क्रीडा पत्रकारामुळे जगातील प्रत्येक क्रीडाप्रेमी या स्पर्धांबाबतची सर्व प्रकारची माहिती घरी बसून सहज मिळवू शकतो. क्रीडा पत्रकारांच्या  तत्परता, निःपक्षपातीपणा आणि कौशल्यामुळे आपण प्रत्येक खेळाची माहिती मिळवू शकतो.

क्रीडा पत्रकार दिनाचा इतिहास

इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन (AIPS) ने 1994 मध्ये जागतिक क्रीडा पत्रकार दिनाची सुरूवात केली. शिवाय, पॅरिसमधील उन्हाळी ऑलिंपिक दरम्यान 2 जुलै 1924 रोजी झालेल्या AIPS संस्थेच्या स्थापनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  क्रीडा माध्यमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक पत्रकारांचा गौरव आजच्या दिवशी केला जातो.

क्रीडा पत्रकार दिन का साजरा केला जातो

हा दिवस विविध क्रीडा पत्रकारांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याकरता साजरा केला जातो. अनेक माध्यम संस्था या दिवशी त्यांच्या क्रीडा पत्रकारांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतात. जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील खेळांबद्दल जागरूकता निर्माण करणे.

क्रीडा पत्रकारिता काय आहे

क्रीडा पत्रकारिता म्हणजे प्रामुख्याने क्रीडा  संबंधित सर्व बातम्या आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. क्रीडा पत्रकारिता हा कोणत्याही वृत्त माध्यम संस्थेचा मुख्य आणि आवश्यक विभाग आहे. खेळांच्या वाढत्या प्रभावामुळे क्रीडा माध्यमांचा प्रभावही सातत्याने वाढत असून, या क्षेत्रात प्रगती, नोकरी इत्यादी संधीही वाढल्या आहेत.

या क्षेत्रातील वाढत्या प्रगतीमुळे आणि लोकप्रियतेमुळे, क्रीडा आणि क्रीडा जगताशी संबंधित बातम्या कव्हर करणाऱ्या अनेक संस्था आहेत. फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेत अशी अनेक वृत्तपत्रे आहेत, जी केवळ क्रीडा जगताच्या बातम्या प्रसिद्ध करतात. त्याची मुख्य उदाहरणे L’Eqquipe, La Gazzaetta dello Sports Marca इ.  यंदाच्या जागतिक क्रीडा पत्रकार दिनाच्या उत्सवासाठी कोणतीही खास थीम नाही. क्रीडा पत्रकारितेशी संबंधित व्यक्तींच्या प्रयत्नांचा सत्कार करणे हाच आजच्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 

क्रीडा पत्रकार दिन कसा साजरा केला जातो

 विविध क्रीडा संघटना जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा करण्यासाठी असंख्य कार्यक्रम आयोजित करतात. क्रिडा क्षेत्रातील अनेक  पत्रकारांना आजच्या दिवशी त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दस पुरस्कार दिले जातात.

 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts