Dharmaj Village : | Dharmaj Village : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; गावकऱ्यांची श्रीमंती पाहून तुम्हीही थक्क व्हाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dharmaj Village : गाव म्हटलं की दूरवर दिसणारे धुळीचे रस्ते, बैल-घोडागाड्या, कच्ची-पक्की घरे, शेते असं चित्र डोळ्यांसमोर येते, पण गुजरातच्या आणंद जिल्ह्यात वसलेल्या धर्माज (Dharmaj Village) या गावची गोष्ट उलगडताना तुम्हीही थक्क व्हाल. या गावची लोकसंख्या केवळ 11,333 असूनही, हे गाव इतरांपेक्षा वेगळं ठरलं आहे. या गावात 13 हून अधिक बँकांची विलक्षण संख्या आहे.

गेली अनेक दशके या गावातील (NRI) उद्योजक व्यक्तींनी आपली कष्टाची संपत्ती स्थानिक बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये गुंतवली असून 2014 मध्ये त्यांनी 1,000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती गोळा केली आहे. धर्माज या गावाने भारतात सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.

या गावात ऐश्वर्य आणि भव्यता आहे, हे येथील रहिवाशांच्या आलिशान जीवनशैलीतून दिसून येते. या गावाकडच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या देखण्या गाड्या पाहिल्याशिवाय नजर चुकत नाही. धर्माजमधील प्रत्येक व्यक्तीने मेहनतीने पैसे कमावले असून पिढ्यानपिढ्या गावाच्या समृद्धीला चालना दिली आहे.

धर्माज गावातील व्यक्ती आपल्या राज्याच्या विकास आणि प्रगतीसाठी अतूट बांधिलकी दर्शवतात. या गावात सरकारी शाळा असून नामांकित निवासी शाळाही आहेत. गावात जुन्या पद्धतीची घरेही आहेत, तर हायटेक तंत्रज्ञानाने बनवलेल्या इमारतीही मुबलक प्रमाणात आहेत. गावात एक अप्रतिम जलतरण तलाव देखील आहे. गावात पाटीदार समाजाचे बहुतांश लोक राहतात. याशिवाय ब्राह्मण आणि दलित जातीचे लोकही या गावात राहतात.

गावकऱ्यांनीच केला गावचा विकास 

धर्माज गावचं सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे या गावची समृद्धी. आणि त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे गाव कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आहे. परदेशात स्थायिक झालेले धर्माज लोक आपल्या गावाच्या विकासासाठी पैसे पाठवतात. त्याचा परिणाम गावातील पर्यावरणावरही दिसून येतो. गावातील बहुतांश रस्ते आणि गल्ल्या पक्क्या आहेत. काही चौक परदेशातील शहरांसारखे बनवले आहेत.

2019 च्या 5 वर्षांच्या टेबल एसीएस जनगणनेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील सर्व भारतीयांपैकी अंदाजे 20% भारतीय गुजरातमधील आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या 42 लाख 40 हजार 466 भारतीयांपैकी 8 लाख 48 हजार 93 गुजराती आहेत. या व्यतिरिक्त, कॅनडाच्या ताज्या आकडेवारीनुसार 92,005 लोक घरी गुजराती बोलतात. भारतातील सामान्य गावांप्रमाणेच चौकाचौकात शेतीबद्दल चर्चा कमी होते, या विरूद्ध इथे लोक आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठ्या उत्साहाने चर्चा करतात. 

महत्त्वाच्या बातम्या : 

CSMT सह इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेली ‘ही’ रेल्वे स्थानकं, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना; आजही आहेत देशाची शान

[ad_2]

Related posts