भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात मोठा बदल, ब्रायन लारा यांना संघाने दिली मोठी जबाबदारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयसीसी विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर भारतासोबत भिडणार आहे. १२ जुलैपासून दोन्ही संघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटीशिवाय तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिकाही खेळणार आहे. विश्वचषक फेरीतून वेस्ट इंडिज संघ बाहेर पडल्यानंतर आता माजी दिग्गज ब्रायन लारा यांना संघात बोलावणे धाडले आहे.

ब्रायन लारा कॅरेबियन संघाचे परफॉर्मन्स मेंटॉर म्हणून असतील. अलीकडच्या काळातील वेस्ट इंडिजची कामगिरी अतिशय लाजिरवाणी झाली आहे. या स्पर्धेत दोन वेळा चॅम्पियन असूनही वेस्ट इंडिज वनडे विश्वचषकाचा भाग नसण्याची ४८ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत ब्रायन लारा संघात आल्यानंतर त्यांच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. हे येणार्‍या काळातच कळेल, पण सध्या वेस्ट इंडिजचा संघ वाईट टप्प्यातून जात आहे.

लारा वेस्ट इंडिजला सावरणार

ब्रायन लारा हे त्यांच्या काळातील महान फलंदाज होते. वेस्ट इंडिजसाठी १३१ कसोटी आणि २९९ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने ५२.८८ च्या सरासरीने ११९५३ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यांनी ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांची नोंद केली आहे. लारा यांची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या ४०० धावा आहे. त्याचबरोबर त्यांनी वनडेमध्ये १०४०५ धावा केल्या. वनडे फॉरमॅटमध्ये लारा यांनी ४०.४८ च्या सरासरीने १९ शतके आणि ६३ अर्धशतके झळकावली आहेत. अशा स्थितीत सध्या वेस्ट इंडिज संघाला लारा यांची साथ म्हणजे निश्चितच मोठी मदत होईल. लारा आता उद्ध्वस्त झालेल्या वेस्ट इंडिज संघाला संजीवनी देण्याचे काम करतील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: १२ ते १६ जुलै – विंडसर पार्क, डॉमिनिका (संध्याकाळी ७:३० वाजता भारतीय वेळेनुसार)
दुसरी कसोटी: २० ते २४ जुलै – क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद (संध्याकाळी ७:३० वाजता भारतीय वेळेनुसार)

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिली एकदिवसीय: २७ जुलै – केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस (संध्याकाळी ७ वाजता भारतीय वेळेनुसार)
दुसरी एकदिवसीय: २९ जुलै – केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस (संध्याकाळी ७ वाजता भारतीय वेळेनुसार)
तिसरी एकदिवसीय: १ ऑगस्ट – ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद (संध्याकाळी ७ वाजता भारतीय वेळेनुसार)

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-२०: ३ ऑगस्ट
दुसरा टी-२०: ६ ऑगस्ट
तिसरा टी-२०: ८ ऑगस्ट
चौथा टी-२०: १२ ऑगस्ट
पाचवा टी-२०: १३ ऑगस्ट

[ad_2]

Related posts