Maharashtra News Nashik News Sharad Pawar’s Maharashtra Tour, Starting From Nashik District, Informed By Jayant Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jayant Patil NCP : आताची सर्वात मोठी बातमी नाशिकमधून (Nashik) येत असून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या माहितीनुसार शरद पवार हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असून पहिला दौरा हा नाशिकपासून होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षात फूट पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यांनतर वातावरण तापले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून आमदारांवर कारवाई केली जात आहे. त्यानंतर लागलीच शरद पवार हे आता महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. आज जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), नागपूर, सोलापूर आदींसह महत्वाच्या जिल्ह्यांचा दौरा शरद पवार करणार असल्याचे म्हणाले आहेत. शरद पवार हे दौऱ्याची सुरवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. 

जयंत पाटील यावेळी म्हणाले की, नाशिक वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेचे (Nashik NCP Office) कार्यालय आहे. या कार्यालयात शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी दीड वाजता बैठक होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे तिथं कोणी अडवू शकेल, असं कुणी नाही, तसा कुणाला अधिकार नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यालयात जाऊन बैठक घेतली, तर तिथं जाऊन कोणाला अडथळा आणण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. ज्याप्रमाणे शरद पवार यांनी साताऱ्यात भूमिका मांडली आहे की, जनता आपल्या पाठीशी असून आता जनतेत जाऊन संवाद साधण्याची गरज आहे. त्यानुसार लवकरच नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणेसह काही इतर जिल्ह्यात शरद पवार स्वतः दौरा करणार असून याबाबतची बैठक दिल्ली येथे घेण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. 

अजित पवार गटाचा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा 

राज्यातील बदललेल्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी पक्षातही दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. अजित पवार, छगन भुजबळ यांच्या बाजूने असलेल्या गटातील नेत्यांवर राष्ट्रवादीच्या मूळ पक्षाकडून कारवाई करण्यात येत आहे. कालच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील घडामोडींमुळे काल सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता. मात्र काल उशिरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष खैरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी कार्यालयाजवळ स्थानिक नेत्यांनी जमायला सुरवात केली आहे. कार्यालयाबाहेर छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

[ad_2]

Related posts