[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रतन टाटा श्वानप्रेमी आहेत. कुत्र्यांवर त्यांचा विशेष जीव आहे. त्यांचं प्राणीप्रेम अनेकदा दिसलं आहे. केवळ प्राणीप्रेम दाखवून ते थांबलेलं नाहीत. तर कुत्र्यांचा जीव वाचावा यासाठी त्यांच्या गळ्यात रेडियम कॉलर लावण्याचे उपक्रम त्यांच्यामार्फत राबवले जातात. अंधारात कुत्रे दिसावेत आणि त्यांचे अपघात टळावेत, हा टाटांचा हेतू आहे. आता पावसाला सुरुवात होताच टाटांनी एक कुत्रे आणि मांजरांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
पावसाच्या दिवसात भटके कुत्रे, मांजरी रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनांच्या खाली आश्रय घेतात. पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कुत्रे, मांजरी वाहनांच्या खाली जाऊन बसतात. वाहन चालक, वाहन मालक यांना बऱ्याचदा खाली असलेल्या प्राण्यांची कल्पना नसते. ते वाहन सुरू करतात. त्यामुळे प्राणी जखमी होतात. काहीवेळा त्यांचा जीवही जातो. पावसापासून आश्रय घेणाऱ्या प्राण्यांना वाचवण्याचं आवाहन टाटांनी केलं आहे.
‘मान्सूनचं आगमन झालं आहे. बरेचसे भटके कुत्रे आणि मांजरी आपल्या कारखाली आश्रय घेतात. या प्राण्यांना कोणत्याही दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी, त्यांना होऊ शकणारा इजा टाळण्यासाठी कार सुरू करण्याआधी एकदा कारखाली पाहणं गरजेचं आहे. कारखाली असलेल्या प्राण्यांबद्दल आपण अनभिज्ञ असल्यास ते गंभीररित्या जखमी होऊ शकतात. त्यांना अपंगत्व येऊ शकतं. त्यांचा जीवदेखील जाऊ शकतो,’ असं टाटांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
[ad_2]