[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हैदराबाद : विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आरसीबीला प्ले ऑफच्या शर्यतीत भक्कम स्थान मिळवण्यासाठी मोलाचे ठरले. कोहली आणि फॅफ ड्यु प्लेसिस यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादवर धडाकेबाज विजय साकारला. हेन्रीच क्लासिनच्या शतकाच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १८६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करायला आरसीबीचे सलामीवीर मैदानात उतरले आणि कोहली व फॅफ यांनी संघाचा विजय निश्चित केला.या विजयासह आरसीबीने आपले प्ले ऑफमधील आव्हान कायम ठेवले आहे. कोहलीने यावेळी ६२ चेंडूंत षटकाराह आपले शतक पूर्ण केले. बऱ्याच कालावधीनंतर कोहलीचे शतक पाहायला मिळाले आणि त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाले. कारण विराट कोहली हा फॉर्मात आला होताच, पण त्याचबरोबर आरसीबीने प्ले ऑफमधील आपले स्थान भक्कम केले होते. शतकानंतर कोहली जास्त काळ खेळू शकला नाही आणि तो १०० धावांवरच बाद झाला. कोहलीने ६३ चेंडूंत १२ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १०० धावा केल्या. कोहलीने हे शतक झळकावले आणि त्यासह त्याने आता एक इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत आरसीबीकडून ७५०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आरसीबीच्या एकाही खेळाडूला एवढ्या धावा आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये करता आल्या नव्हता. पण आरसीबीशी कायम पाठिशी राहणाऱ्या कोहलीने हा मोठा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. कोहली आणि फॅफ यांनी यावेळी १७२ धावांची दणदणीत सलामी दिली.
कोहली बाद झाला आणि त्यानंतर काही वेळातच फॅफही बाद झाला. फॅफने यावेळी ४७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची खेळी साकारली. हे दोघे बाद झाले तरी त्यांनी आपले आपले काम चोख बजावले होते. फक्त त्यांना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. पण या दोघांनी आरसीबीचा विजय मात्र पक्का केला होता. या विजायसह आरसीबीने आता गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.
[ad_2]