Are you ever going to stop or not ajit pawars question to sharad pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजच्या बैठकीत बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच  त्यांनी अनेक गौफ्यस्फोटही केले आहेत. 

अजित पवार शरद पवारांना संबोधत म्हणाले की, गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहे. आता 80 वर्षाचे झाले. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे.  आता तुमचे वय झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे.

भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटे बोलत नाही आणि खोटे बोलले तर पवारांची औलाद सांगणार नाही,असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये भाजपसोबत पाच बैठका झाल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.

अनेकदा मी माघार घेतली. मी टीका सहन केली. अनेकदा मी अपमान सहन केले. पण मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं तर का तिथे आम्हाला पाठवलं. 2017 लाही असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. 

भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले, आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की बाहेर काहीच बोलायचं नाही, असे अजित पवार म्हणाले.


हेही वाचा

अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, पहा कुठे आहे

[ad_2]

Related posts