Environmental Activists Arrested At Wimbledon For Throwing Confetti And Puzzle Pieces On Court

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wimbledon 2023 : इंग्लंडमध्ये पर्यावर्णवादी संस्था ‘जस्ट स्टॉप ऑइल’ यांचं आंदोलन सुरु आहे. अॅशेस कसोटी सामन्यातही या आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला होता. या आंदोलन करणाऱ्यांनी आता विम्बल्डनमध्येही गदारोळ घातला आहे. आज विम्बल्डनमध्ये सामन्याला सुरुवात झाल्यानंतर एक वेगळचं दृश्य पाहायला मिळाले. पर्यावरणवादी आंदोलनकर्त्यांनी कोर्ट 18 वर केशरी रंगाची वाळूसारखी काहीतरी स्तू आणि कोड्याचे तुकडे (confetti and puzzle pieces) फेकले होते. यामळु खेळात व्यत्यय निर्माण झाला होता. काही वेळासाठी सामना थांबवावा लागला. पोलिसांनी दोन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यातही अशेच दृश्य पाहायला मिळाले होते. आज पुन्हा एकदा आंदोलन करणाऱ्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. 

‘जस्ट स्टॉप ऑइल’ प्रोटेस्टमुळे  विम्बल्डन 2023 च्या तिसऱ्या दिवशी व्यत्यय आला होता. पुरुष एकेरी सामन्यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी कोर्ट 18 वर गोंधळ घातला. त्यामुळे थोड्यावेळासाठी सामना थांबवावा लागला. पावसामुळे आधीच सामन्याला उशीर झाला होता. त्यात ऑइल प्रोटेस्टमुळे आणखी उशीर झाला. कोर्ट 18 वर आंदोलन करणाऱ्यांनी केशरी रंगाची पावडर फेकली. त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले. त्यानंतर मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी कोर्ट 18 स्वच्छ केले. आंदोलनकर्त्यांमुळे कोर्टचं कोणतेही नुकसान झाले नाही. दरम्यान, अॅशेस सामन्यादरम्यानही जस्ट स्टॉप ऑइल प्रोटेस्ट करणाऱ्यांनी व्यत्यय निर्माण केला होता. जस्ट स्टॉप ऑयल प्रोटेस्टमध्ये असणाऱ्या काही पर्यावरणवादी आंदोलनकर्त्यांनी ब्रिटनमध्ये काही महत्वाच्या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. ‘जस्ट स्टॉप ऑइल’ प्रोटेस्टमुळे  ग्रासकोर्ट ग्रँड स्लॅमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

दोन जणांना अटक –

कोर्ट 18 वर झालेल्या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती विम्बल्डनच्या आयोजकांनी दिली आहे.  पावसामुळे आणि आंदोलन करणाऱ्यांमुळे सामना उशीरा सुरुवात झाला. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी त्या दोन जणांना ताब्यात घेतलेय.  

आंदोलनकर्त्यांनी कुठे कुठे घातला व्यत्यय –

जस्ट स्टॉप ऑयल प्रोटेस्टच्या आंदोलनकर्त्यांनी इंग्लंडमध्ये अनेक मोठ्या कार्यक्रमात व्यत्यय घातला आहे. यंदा झालेल्या प्रीमियरशिप रग्बी फायनल, शेफील्डमध्ये विश्व स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये गोंधळ घातला होता. त्याशिवाय अॅशसमध्येही आंदोलनकर्त्यांनी मैदानात धाव घेतली होती. ब्रिटीश सरकारने तेल, वायू आणि कोळसा प्रकल्प लगेच थांबवावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे.

फक्त ऑइल स्टॉप म्हणजे काय?
इंग्लंडमध्ये ‘जस्ट स्टॉप ऑइल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्यावरण कार्यकर्त्यांचा एक गट आहे.  ब्रिटीश सरकारने तेल, वायू आणि कोळसा प्रकल्प लगेच थांबवावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. नवीन तेल परवाने देण्यापासून  ब्रिटीश सरकारला रोखण्याचा या गटाचा हेतू आहे. याची स्थापना 2022 मध्ये झाली आहे. 



[ad_2]

Related posts