[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : आरसीबीच्या एका सामन्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता रोहित शर्माची चिंता चांगली वाढलेली आहे.सध्याच्या घडीला गुणतालिका रंजकदार आहे. कारण आरसीबीने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. या १२ सामन्यांमध्ये त्यांनी सहा सामने जिंकले आहेत तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सहा विजयांसह आरसीबीचे आता १२ गुण आहेत. आरसीबीचे आता एकूण दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे जर दोन्ही सामने आरसीबीने जिंकले तर त्यांचे १६ गुण होऊ शकतात आणि ते थेट प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरसीबीने आजचा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होतील. सध्याच्या घडीला मुंबईचेही १४ गुण आहेत. त्यामुळे मुंबई आणि आरसीबीचे समान १४ गुण होतील. पण त्यानंतर रनरेट महत्वाचा ठरेल. सध्याच्या घडीला मुंबईपेक्षा आरसीबीचा रन रेट हा चांगला आहे. त्यामुळे जर आरसीबीने हा सामना जिंकला तर ते मुंबईला धक्का देतील. कारण सध्याच्या घडीला मुंबईचा संघ हा १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आरसीबीने हा सामना जिंकला तर ते चौथ्या स्थानावर विराजमान होतील आणि मुंबईच्या संघाची थेट पाचव्या स्थानावर घसरण होईल. त्यामुळे मुंबईच्या संघासाठी हा मोठा धक्का असेल. आरसीबीचा संघ हा शेवटपर्यंत मुंबईच्या मागे लागलेला असेल. समजला आजचा सामना जरी आरसीबीने गमावला तरी ते मुंबईला प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर काढू शकतात. कारण हा सामना जरी त्यांनी गमावला आणि अखेरचा सामना त्यांनी जिंकला तरी त्यांचे १४ गुण होऊ शकतात. त्यामुळे आरसीबी प्रथम या सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाला गुणतालिकेत धक्का देणार का, याची उत्सुकता आला सर्वांनाच असेल.
आरसीबीचा संघ या सामन्यानंतर मुंबईच्या संघाला धक्का देऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठे बदल होणरा आहेत आणि ते मुंबईसाठी धोकादायक असतील.
[ad_2]