SRH vs RCB Match Change The Future Of 7 Teams, Watch The IPL Playoffs Scenario 2023 ; एका सामन्यामुळे सात संघाचे भवितव्य बदलणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : RCB vs SRH ही मॅच गुरुवारी रंगणार आहे. पण या एकाच सामन्यावर चार संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. हैदराबादचा संघ तर आयपीएलच्या बाहेर पडला आहे. पण हैदराबादचा संघ हा आरसीबीला पराभूत करून सर्व समीकरणं बदलू शकतो.गुणतालिकेत सध्याच्या घडीला पाहिले तर आरसीबीच्या संघाने १२ सामने खेळले आहे. या १२ सामन्यांमध्ये त्यांनी सहा सामने जिंकले आहेत तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सहा विजयांसह आरसीबीचे आता १२ गुण आहेत. आरसीबीचे आता एकूण दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे जर दोन्ही सामने आरसीबीने जिंकले तर त्यांचे १६ गुण होऊ शकतात आणि ते थेट प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. जर आरसीबीने दोन्ही सामने जिंकले तर ते दुससऱ्या स्थानावर पोहोचतील आणि ते मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तिन्ही संघांना धक्का देऊ शकतील. पण त्यासाठी त्यांना आजचा सामान जिंकावा लागेल. हा सामना जर आरसीबीने जिंकला तर सर्नात मोठा धक्का मुंबईच्या संघाला बसू शकतो. त्याचबरोबर पंजाब किंग्स आणि केकेआर या संघांसाठीही ही धोक्याची घंटा ठरू शकते. कारण या सामन्यामुळे आरसीबी १४ गुणांवर पोहोचू शकते आणि त्यांच्याकडे अजून एक सामना शिल्लक राहणार आहे. त्यामुळे हा हैदराबादचा सामना जर त्यांनी जिंकला तर नक्कीच आरसीबी प्ले ऑफच्या दिशेने जाण्यासाठी ठोस पाऊल टाकेल आणि अन्य चार संघांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा सामना आरसीबी जिंकणार की हरणरा, याची उत्सुकता सध्याच्या घडीला सर्वांना लागलेली असेल.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली


सध्याच्या घडीला फक्त गुजरात टायटन्स हा एकच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता सात संघांसाठी प्ले ऑफचे दरवाजे खुले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.

[ad_2]

Related posts