Bangladesh ODI Captain Tamim Iqbal Announces Retirement From All International Cricket

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bangladesh ODI Captain Retirement : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहेत. त्याआधीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमिम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आफगाणिस्तानविरोधात झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर तमिम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली  आहे. तीन महिन्यानंतर भारतामध्ये विश्वचषक होणार आहे, त्यापूर्वच नियमीत कर्णधाराने निवृत्ती घेतल्यामुळे बांगलादेशच्या अडचणी वाडल्या आहेत. 5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात वनडे एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यादरम्यान एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये तमिम इकबाल बांगलादेश संघाचे नेतृत्व करत होता. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 5 जुलै रोजी बुधवारी झाला. यामध्ये बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार आफगाणिस्तानने 17 धावांनी विजय मिळवला. य सामन्यानंतर तमीम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तमीम याच्यानंतर बांगलादेशच्या संघाची धुरा कोण सांभाळणार? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

तमीम इकबाल याने पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेला अलविदा घेतल्याचे जाहीर केला. तडकाफडकी राजीनामा घेत तमीम इकबाल याने बांगलादेशच्या चाहत्यांना धक्का दिला. 34 वर्षीय तमीमने बांगलादेशसाठी 2007 मध्ये पदार्पण केले होते. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यात तमीमने बांगलेदशचं नेतृत्व केलेय. 

37 वनडे मध्ये बांगलादेशचं नेतृत्व –

तमीम इकबाल याने 37 एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचं नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये 21 सामन्यात बांगलादेशला विजय मिळाला आहे तर 14 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तमीम याने कर्णधार असताना 34 च्या सरासरीने 1132 धावा केल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय करिअर कसे राहिलेय ?

तमीम इकबाल याने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 टी20 सामन्यात बांगलादेशच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इकबाल याने 70 कसोटीच्या 134 जावात 39 च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. त्याशिवाय वनडेमध्ये 37 च्या सरासरीने 8313 धावा केल्या आहेत. बांगलादेशसाठी या सर्वाधिक धावा आहेत. बांगलादेशसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा तमीमच्या नावावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तमीमच्या नावावर 14 शतके आणि 56 अर्धशतकांची नोंद आहे. टी20 मध्येही तमीम इकबाल याने प्रभावी कामगिरी केली आहे. तमीम याने टी20 मध्ये 24 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत.  
 



[ad_2]

Related posts