PBKS Vs RR IPL 2023 Hpca Cricket Stadium Pitch Report Dharamshala Hp Weather Updates Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PBKS vs RR Pitch Report: आज आयपीएलच्या मैदानात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) संघ एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघांचा यंदाच्या सीझनमधील आजचा शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये खेळण्याची आपल्या अंधुक अपेक्षा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात आज मैदानात उतरलीत. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. तसेच, दोघांचेही पॉईंट टेबलमध्ये 13 गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये पंजाबच्या पुढे आहे. 

पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यातील IPL 2023 चा 66 वा सामना 19 मे रोजी HPCA स्टेडियम धरमशाला येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. 

धरमशाला येथील खेळपट्टी कशी असेल? 

2013 मध्ये पहिल्यांदाच धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात 400 हून अधिक धावा झाल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते, असा अंदाज क्रिडा विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत केली जाऊ शकते. अशावेळी फलंदाजांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पॉवरप्लेनंतर फलंदाजी अधिक सोपी होईल अशी अपेक्षा आहे. 

पाऊस करणार खेळाचा बेरंग? 

डोंगरावर वसलेल्या धरमशाला येथील हवामान आज पूर्णपणे स्वच्छ असणार आहे. शुक्रवारी कमाल तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत असण्याचा अंदाज आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि तोपर्यंत तापमान 20 ते 22 अंशांच्या आसपास असेल. पाऊस नसल्यानं धरमशाला येथे चाहत्यांना पूर्ण सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहायला मिळणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांचे संभाव्य संघ 

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ :  

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, जो रूट, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन , युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, एडम ज़म्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ठ आणि अब्दुल पीए

पंजाब किंग्सचा संभाव्य संघ : 

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंह बराड, ऋषि धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत बराड, सॅम करेन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्वाथ कावेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंह 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 Points Table: हैदराबादला हरवून बंगळुरू टॉप-4मध्ये; पॉईंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, ‘या’ संघांची धाकधूक वाढली

[ad_2]

Related posts