Rohit Sharma Back In Form And Scored Half Century In 1st Match In West Indies ; रोहित फॉर्मात आला रे… वेस्ट इंडिजच्या पहिल्या सामन्यातील तुफानी बॅटींगचा Video व्हायरल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून धावांचा दुष्काळ अनुभवत होता. पण आता वेस्ट इंडिजमधील पहिल्याच सामन्यात रोहित हा चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले. कारण या पहिल्याच सामन्यात रोहितने तुफानी फटकेबाजी केली. रोहितच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.रोहित शर्माकडून हा गेल्या काही दिवासांमध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली नव्हती. आयपीएलमध्येही रोहित अपयशी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही रोहित नापास ठरला होता. रोहितवर यावेळी कर्णधारपदाचे जास्त दडपण असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण वेस्ट इंडिजमध्ये पाय ठेवताच रोहित हा भन्नाट फॉर्मात परतला आहे.

रोहित शर्मा यावेळी सलामीला उतरला होता. सलामीला येताना रोहितने सुरुवातीला थोडा संयतपणे खेळ केला, पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने दमदार फलंदाजी केली. यावेळी रोहितने ६७ चेंडूंचा सामना करताना अर्धशतक झळकावले. या खेळीत रोहितने एक भन्नाट षटकार मारला आणि त्याचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने आपला आवडता पुल शॉट मारल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितने सहजपणे हा फटका मारला, त्यामुळे रोहित आता फॉर्मात आल्याचे दिसत आहे. पण रोहितने ६७ चेंडूचा सामना खेळल्यावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कारण यावेळी भारतीय खेळाडूंचा सराव सामना सुरु होता. भारताच्या खेळाडूंनी दोन संघ बनवले असून त्यांचा पहिला सराव सामना बुधवारी सुरु झाला आहे. या सामन्यात रोहितने दमदार फलंदाजी केल्याचे आता समोर आले आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

रोहित शर्मा हा पहिल्याच सामन्यात चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या दौऱ्यात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आता चाहत्यांना असेल. भारताचा वेस्ट इंडिजचा दौरा खऱ्या अर्थाने १२ जुलैपासून सुरु होणार आहे. कारण या दिवसापासून दोन्ही संघांत पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.

[ad_2]

Related posts