[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होतात. पण अनेकदा हा वाद विकोपाला जातो अन् हिंसाचारात रुपांतर होतं. उत्तर प्रदेशमध्ये नवरा बायोकाचा वादही असाच विकोपाला गेला. नवऱ्याला चहाची तलप झाली. त्याने पत्नीकडे चहाची मागणी केली. पण पत्नीने चहा दिला नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट पतीच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या धक्कादायक प्रकाराची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होतेय. हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणाने घडला, याबाबत स्पष्ट माहिती नाही, पण प्रथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये चहावरुन वाद झाला होता. तर काही रिपोर्ट्सनुसार, मोबाईलवरुन वाद झाल्याचं समजतेय.
रिपोर्ट्सुनासर, पतीने युट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी पत्नीकडून मोबाईल मागितला. मात्र, पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून या दोघांमध्ये वाद झाली. परिणामी रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्याचे समजतेय. तर इतर काही वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार पतीने पत्नीकडून चहा मागितला. पत्नीने चहा देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच, तिचा शोधही सुरू करण्यात आला आहे.
मिळाल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेल्या या वादाआधी पत्नीने पतीविरोधात पोलिसात कौटुंबिक हिंचाराची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या दोघांनाही समज दिला होता. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढलेय. अंकित आणि प्रियंका यांच्यातील वादाची सद्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही पत्नीने पतीच्या डोळ्यात कात्री घातल्याची चर्चा सुरु आहे.
संपू्र्ण प्रकरण काय ?
उत्तर प्रदेशमधील बडोली रोड येथील अंकित याचे तीन वर्षांपूर्वी रामाळा पोलीस ठाणे हद्दीतील सूप गावात राहणाऱ्या तरुणीशी (प्रियंका) लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, मात्र गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, मारामारी सुरू होती. बुधवारी तरुणाने पत्नीला चहा मागितला असता पत्नीने रागाच्या भरात खोलीतील कात्री उचलून खाटेवर बसलेल्या पती अंकितच्या डोळ्यात वार केले. त्यामुळे अंकितला रक्तस्त्राव होऊन तो जमिनीवर पडला. आवाज ऐकून तरुणाच्या वहिनी व मुलांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तरुणाची पत्नी घरातून पळून गेली. जखमी अंकित याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
[ad_2]