Maharashtra News Latur News Killing Of A Youth Who Witnessed An Immoral Relationship Killed For Fear Of Infamy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latur Crime News : लातूर जिल्ह्याच्या (Latur District) चाकूर तालुक्यातील चिद्रेवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 32 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंध सुरु असताना या युवकाने पहिल्याने आता आपली बदनामी होईल या भीतीने दोघांनी तरुणाचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारुन हत्या (Murder) केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर याप्रकरणी वाढवणा पोलिसांत दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे. तर गणेश गोपीनाथ वस्तुरगे (वय 32 व्र्ह्से, रा. चिद्रेवाडी, ता. चाकूर) असे मयत युवकाचे नाव असून, प्रदीप शंकर करडखेले (रा. खरबवाडी, ता. अहमदपूर) याच्यासह एक महिला आरोपी आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथील प्रदीप करडखेले आणि उदगीर तालुक्यातील एका गावातील महिलेचे गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. तर सोमवारी (15 मे) रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात सुरु असलेले अनैतिक संबंध गणेश वस्तुरगे याने पाहिले होते. त्यामुळे गणेश आपल्या अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल अशी भीती प्रदीप करडखेले आणि संबंधित महिलेमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांनी गणेश वस्तुरगे यांचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून त्याची हत्या केली. गणेशला संपवल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत नेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

खाक्या दाखवताच खुनाची कबुली

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तापसाची सूत्र फिरवली आणि प्रदीप करडखेलेसह एका महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. तर गणेशचा मोबाईल फेकून अथवा लपवून ठेवला असावा, अशा आशयाची फिर्याद गणेशच्या आई शिवगंगाबाई गोपीनाथ वस्तूरगे (रा. चिद्रेवाडी) यांनी दिली आहे. त्यानुसार वाढवणा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना गुरुवारी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

news reels reels

Latur Freestyle : ‘त्या’ दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

[ad_2]

Related posts