You-can-view-tweets-without-logging-elon-musk-changed-his-decision-from-closed-to-semi-open-platform Marathi News | Twitter Update : आता ट्विटरवर अकाऊंटशिवाय पुन्हा ट्वीट पाहता येणार, पण..’ही’ अट आहे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Twitter Update : गेल्या काही दिवसांपासून, ट्विटरच्या संदर्भात गोंधळ सुरू आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरमध्ये अनेक बदल करतायत त्यामुळे यूजर्सना  अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. नुकतेच, ट्विटरने नोंदणी नसलेल्या यूजर्सना ब्राउझरद्वारे ट्विट पाहण्यास बंदी घातली होती. यासाठी यूजर्सनी ट्विटर अकाऊंट सुरु करून लॉग इन करणे आवश्यक होते. मात्र आता, ब्राउझरमध्ये Twitter लिंक पाहण्यासाठी तुम्हाला यापुढे Twitter अकाऊंटची आवश्यकता भासणार नाही. मात्र, यामध्ये देखील एक अट घालण्यात आली आहे. ट्विटरने गुप्तपणे हे निर्बंध हटवले आहेत अशी एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

‘ही’ आहे अट

ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे ट्विटरमध्ये एकामागून एक बदल करून यूजर्सना गोंधळात टाकतायत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरला ओपन प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले होते. त्यानंतर, अकाऊंटशिवाय कोणीही ट्विटरवरील कंटेंट पाहू शकत नाही अशी अट घातली. मात्र, पुन्हा एकदा मस्क यांनी एका अटीसह ट्विटर वापरण्याची परवानगी दिली आहे. एलॉन मस्क यांनी नुकतीच अकाऊंटशिवायही ट्विटरवरील मजकूर पाहू/वाचू शकता. पण यात अट अशी आहे की तुम्ही अकाऊंटशिवाय फक्त एकच ट्विट पाहू शकता. म्हणजेच एका ट्विटमध्ये एकापेक्षा जास्त ट्विट जोडले गेले असतील तर ते तुम्हाला पाहता येणार नाहीत. ते पाहण्यासाठी तुमच्याकडे ट्विटर अकाऊंट असणं आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त, तुम्ही लॉगिन केल्याशिवाय यूजरचे प्रोफाईल पाहू शकणार नाही तसेच काहीही सर्च करू शकणार नाही. यासंदर्भात मस्क किंवा ट्विटरकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, सध्या ट्विटर अकाऊंट लॉग इन न करता ट्वीट पाहू शकत होतो असे यूजर्सकडून सांगण्यात आले आहे. तसेही, जेव्हा मस्क यांनी प्लॅटफॉर्मवर मर्यादा लादली होती, तेव्हा त्यांनी त्याला तात्पुरता निर्णय असल्याचे म्हटले होते. 

ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी थ्रेड्स लाँच केले

ट्विटरने अद्याप जाहीर केले नाही की ते यूजर्सना लॉग इन न करता लिंकद्वारे ट्वीट पाहण्याची परवानगी दिली आहे. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मेटा ने इंस्टाग्रामचे ट्विटर प्रतिस्पर्धी, थ्रेड्स अॅप लाँच केल्यामुळे बंदी उठवण्याचा ट्विटरचा निर्णय घेण्यात आला आहे का? अशी शंका उपस्थित होतेय.  

महत्त्वाच्या बातम्या :

Threads App : मेटाच्या ‘थ्रेड्स’ अॅपची थेट ‘ट्विटर’शी होणार स्पर्धा; ‘या’ सेलिब्रिटींनी सुरु केलं थ्रेड्सवर अकाऊंट

[ad_2]

Related posts