[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कोण आहे हा क्रिकेटपटू?
धोनीमधील प्रतिभा ओळखून त्याच्याबद्दल बीसीसीआयला सुचवणारी ती व्यक्ती होती प्रकाश पोद्दार. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या प्रकाश पोद्दार यांना २००३ मध्ये जमशेदपूरला पाठवण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने टॅलेंट स्काऊट सुरू केले. पोद्दार हे त्याचाच एक भाग होते. धोनीचा खेळ पाहिल्यानंतर पोद्दार यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी धोनीच्या नावाची शिफारस केली. त्यांनी धोनीबद्दल लिहिले – चेंडूचा चांगला स्ट्रायकर, त्याच्याकडे खूप शक्ती आहे पण त्याला विकेटकीपिंगवर काम करण्याची गरज आहे. तांत्रिकदृष्ट्या खूप चांगला नाही पण विकेट्सच्या दरम्यान धावण्यास अतिशय जलद आहे.
प्रकाश पोद्दार यांनी पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यातच शतक झळकावले होते. २९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही पण ते आपल्या राज्याकडून ७४ प्रथम श्रेणी आणि एक लिस्ट ए सामना खेळले होते.
धोनीला केवळ ३५ धावा करता आल्या
प्रकाश पोद्दार पाहण्यासाठी आलेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने केवळ ३५ धावा केल्या. पण त्याच्या दमदार शॉर्टसने पोद्दारांचे लक्ष वेधून घेतले. एका मुलाखतीत पोद्दार म्हणाले होते, ‘त्याने ३५ धावा केल्या पण त्या वयातही तो चेंडूवर काय शॉट मारत होता. त्याच्याकडे ताकद होती आणि मला वाटले की जर आपण त्याला चांगले मार्गदर्शन केले तर तो एक चांगला एकदिवसीय क्रिकेटपटू होऊ शकतो.’
महेंद्रसिंग धोनी एनसीएमध्ये गेला. त्यानंतर त्याची भारत अ संघात निवड झाली. त्यावेळी टीम इंडियाकडे असा यष्टिरक्षक नव्हता जो बॅटनेही चमत्कार करू शकेल. अशा परिस्थितीत २००४ च्या अखेरीस धोनीला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. २००७ मध्ये त्याला कर्णधारपद मिळाले आणि मग एकंदरीत ऐतिहासिक कामगिरी सुरु झाली.
[ad_2]